Mon. Dec 6th, 2021

सीमा भागातील मराठी शिक्षकांना प्राधान्याने नोकरी – मंत्री सुभाष देसाई

सीमा भागातील मराठी शिक्षकांसाठी आनंदाची बातमी आहे. सीमा भागात उपलब्ध असणाऱ्या शिक्षकांना प्राधान्याने नोकरी देणार असल्याची ग्वाही मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांनी दिली आहे.

महाराष्ट्र एकीकरण समितीच्या सांस्कृतिक सदस्यांनी मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांची आज भेट घेतली.

या बैठकीत एकीकरण समितीच्या सदस्यांनी मंत्री सुभाष देसाई यांच्यासोबत विविध समस्यांवर चर्चा केली.

तसेच सीमा भागांमधील मराठी शाळा टिकवणं, सांस्कृतिक संस्था, ग्रंथालंय आणि नाट्यचळवळ वाढवण्यासाठी राज्य सरकार प्रयत्न करेल, अशी ग्वाही मंत्री सुभाष देसाई यांनी एकीकरण समितीच्या सदस्यांना दिली.

तसेच सीमा भागातील मराठी शिक्षक असल्यास, त्यांना प्रथम प्राधान्य देत नोकरीची संधी देणार असल्याची ग्वाही सुभाष देसाई यांनी दिलं.

सीमाभागांमधील मराठी कलाकारांनी नाटकं सादर केल्यास राज्य सरकारकडून अर्थसहाय्य देण्याचं ग्वाही सुभाष देसाई यांनी दिलं.

तसेच सीमावर्ती भागातील समस्यांबाबत महाराष्ट्र एकीकरण समितीने प्रस्ताव सादर केल्यास प्रकरणनिहाय मार्ग काढण्याचं आश्वासनही सुभाष देसाई यांनी दिलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *