Thu. Sep 29th, 2022

६८ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांत मराठी चित्रपट अग्रेसर.

मनोरंजन क्षेत्रात महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा आज २२ जुलैला करण्यात आली आहे . या पुरस्कारांची घोषणा तसेच पुरस्कार सोहळ्याचे आयोजन या सर्वांची जबाबदारी डायरेक्ट्रेट ऑफ फिल्म फेस्टिव्हल या माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या एका शाखेवर सोपवलेली असते.या पुरस्कारांची सुरुवात करण्यासाठी 1949 साली एका समितीची स्थापना करण्यात आली होती. शिक्षण आणि सांस्कृतिक मूल्यांवर आधारित बनलेल्या सर्वोत्कृष्ट चित्रपटांची निवड करणे, हे या समितीचे काम होते. 1954 साली या राष्ट्रीय पुरस्कारांची सुरुवात झाली .राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये प्रत्येक विभागासाठी वेगळा पुरस्कार दिला जातो. रौप्य कमळ, सुवर्ण कमळ अशी त्यांची नावे आहेत. काही पुरस्कारात रोख रक्कम दिली जाते, तर काहींमध्ये केवळ मेडल दिले जातात .

दादसाहेब फाळके पुरस्कार विजेत्यांना सुवर्ण कमळ, 10 लाख रुपये, प्रशस्तीपत्र आणि शाल प्रदान केली जाते. तर सर्वोत्कृष्ट फीचर फिल्मचा पुरस्कार ज्यांना मिळतो, त्यांना सुवर्ण कमळ आणि अडीच लाख रुपयांची रक्कम प्रदान करण्यात येते. बऱ्याच विभागांमध्ये रौप्य कमळ व दीड लाख रुपयांची रक्कम, पुरस्कारार्थ देण्यात येते. हे पुरस्कार सामान्यत: राष्ट्रपतींच्या हस्ते प्रदान करण्यात येतात. मात्र काही वर्षांपासून हे पुरस्कार उपराष्ट्रपती अथवा माहिती व प्रसारण मंत्री यांच्या हस्ते दिले जात आहेत. 2021 साली उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते या पुरस्कारांचे वितरण झाले होते.या पुरस्कारांची घोषणा दिल्लीत करण्यात आली. यामध्ये बेस्ट अ‍ॅक्टरचा पुरस्कार बॉलिवूड अभिनेता ‘अजय देवगण’ याला मिळाला आहे. यासोबतच ‘सूर्याला’ देखील हा पुरस्कार जाहीर झाला आहे.’तान्हाजी’ लोकप्रिय चित्रपट ठरला आहे. सर्वोत्कृष्ट गीतकाराचा पुरस्कार मनोज मुन्तशीर यांना मिळाला. तसेच यंदाच्या पुरस्कारांवर मराठी चित्रपटांनीही आपले नाव कोरले आहे.

‘राहुल देशपांडे’ यांना मी वसंतराव या चित्रपटासाठी गायनाचा राष्ट्रीय पुरस्कार देण्यात आला आहे , ‘गोष्ट एका पैठणीची’ सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाला देखील हा पुरस्कार देण्यात आला, त्याशिवाय सर्वोत्कृष्ट सामाजिक चित्रपट म्हणून ‘फनरल’ या चित्रपटाला गौरवण्यात आले .तर अमोल गोळे दिग्दर्शित ‘सुमी’ हा बालचित्रपट सर्वोत्कृष्ट ठरला.तर वैयक्तित पुरस्कारांमध्ये अनिष्ट गोसावी याला ‘टकटक’ या चित्रपटासाठी आणि आकांशा पिंगळे ,दिव्येश इंदुलकर यांना ‘सुमी’ चित्रपटासाठी सर्वोउत्कृष्ठ बालकलाकार म्हणून पारितोषिक मिळाले तर विशेष उल्लेखनीय फिचर फिल्म हा पुरस्कार ‘गोदाकाठ’ आणि ‘अवांछितसाठी’ विशेष पुरस्कार,अवांछितसाठी ‘किशोर कदम’ यांना राष्ट्रीय पुरस्कार.तसेच ‘जून’चित्रपटासाठी ‘सिद्धार्थ मेननला’ विशेष पुरस्कार मिळाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.