‘मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा’ – सुभाष देसाई

९४व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला सुरूवात झाली असून मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते अभिजात मराठी भाषा दालनाचे उद्घाटन झाले. यावेळी त्यांनी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा असे सुभाष देसाई म्हणाले. सर्वांनी आता मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठी अभियान उभारून त्यात सहभागी व्हावे, असे आवाहन मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांनी केले आहे.
अभिजात मराठी भाषेच्या दालनामध्ये मराठी इतिहासाची उदाहरणे, मराठीचे भाषिक यांवर प्रामुख्याने प्रकाश टाकण्यात आला आहे. तसेच शिवकालीन, पेशवेकालीन, १९व्या शतकातील मराठी, आधुनिक मराठी, मराठी साहित्य अशा दोन हजार वर्षापूर्वीच्या मराठी भाषेसंबंधित शिलालेख, ग्रंथ आदीचे प्रदर्शन अभिजात मराठी भाषेच्या दालनामध्ये करण्यात आले आहे.
ग्रंथदिंडीने मराठी साहित्य संमेलनाची सुरूवात
कुसुमाग्रज स्मारकापासून काढण्यात आलेल्या ग्रंथदिंडीने ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला सुरुवात करण्यात आली. साहित्य संमेलनाच्या निमित्ताने निघालेल्या ग्रंथदिंडीत ढोलताशांचा गजर ऐकायला मिळाला. संमेलनात सहभागी रसिकांनी लेझीम खेळत दिंडीत सहभाग नोंदवला. मल्लखांब हा साहसी खेळ प्रकारही यावेळी पाहायला मिळाला.