Sat. Jul 31st, 2021

धक्कादायक ! महाराष्ट्रात ‘येथे’ मराठी माणसांना क्रिकेट खेळण्यावर बंदी

डोंबिवलीत मराठी भाषिकांनाच क्रिकेट स्पर्धेत नो एन्ट्री करण्यात आली असल्याचे धक्कादायक पोस्टर्स लावण्यात आले आहेत.

डोंबिवलीच्या युवा आशापुरा मित्र मंडळानं यंदा पहिल्यांदाच नमो रमो ट्रॉफी ही क्रिकेट स्पर्धा भरवली असून त्याच्या बॅनरवर या स्पर्धेत फक्त गुजराती, कच्छी आणि मारवाडी खेळाडूच सहभागी होऊ शकतील,अशी अट घालण्यात आली आहे.

या स्पर्धेचं पोस्टर व्हॉट्सपवर प्रचंड व्हायरल झाले आहे. यामुळे समाजात जातीचे राजकारण पसरवण्याचा हा प्रयत्न आहे का असा प्रश्न उपस्थित होत आहे.

धक्कादायक बाब म्हणजे याच बॅनरवर भाजप पक्षाचे चिन्ह आहे. या सगळ्याबाबत आयोजकांना संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही. तर भाजपचे माजी आमदार नरेंद्र पवार यांनी ही स्पर्धा भाजपने आयोजित केलेली नसून त्या समाजापुरती मर्यादित असल्याचं सांगितलं आहे.

दुसरीकडे शिवसेनेनं मात्र या मुद्द्यावरून भाजपला खोचक टोला लगावला आहे. डोंबिवलीकर सहनशील आहेत, त्यामुळे ते यावर काही प्रतिक्रिया देणार नाहीत, मात्र भाजपनं दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करू नये, असं शिवसेनेचे नगरसेवक दीपेश म्हात्रे यांनी म्हटलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *