Tue. Oct 26th, 2021

मराठीतील ‘सोज्वळ सून’ तेजश्री प्रधानचं बॉलिवूडमध्ये पदार्पण, ‘किसिंग सीन’ने चाहते चकीत!

मराठी टेलिव्हिजनवरची लाडकी ‘सून’ तेजश्री प्रधान आता बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. अभिनेता शर्मन जोशीसोबत ती ‘बबलू बॅचलर’ या सिनेमात मुख्य भूमिकेत पाहायला मिळणार आहे. टीव्हीवर सोज्वळ भूमिका करणाऱ्या तेजश्रीने पहिल्याच हिंदी सिनेमात किसिंग सीन दिल्यामुळे चाहत्यांच्या भुवया उंचावल्या आहेत.

View this post on Instagram

#babloobachelor 😊😊😊

A post shared by Tejashri Pradhan (@tejashripradhan) on

‘होणार सून मी या घरची’ या मराठी मालिकेमुळे तेजश्री प्रधान मराठी घराघरांत पोहोचली. सध्या ‘झी मराठी’वर सुरू  असलेल्या ‘अग्गं बाई सासू बाई’ मालिका लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. ‘ती सध्या काय करते’, ‘हाजरी’ या मराठी सिनेमांतूनही रसिकांच्या पसंतीस उतरली होती. आता तिचा पुढचा सिनेमा ‘बबलू बॅचलर’ हिंदी भाषेत आहे. ‘तिला काही सांगायचंय’ या नाटकामधूनही ती प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. त्याचबरोबर ती हिंदी नाटकातही काम करत होती. याच हिंदी नाटकात तिच्यासोबत बॉलिवूड अभिनेता शर्मन जोशी होता. तिच्या पहिल्या सिनेमाचा हिरोदेखील शर्मन जोशीच आहे. त्यामुळे मराठीसोबत आता बॉलिवूडमध्येही तेजश्री प्रधान आपला ठसा उमटवायला तयार झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *