Wed. Jun 16th, 2021

MX Player वर ‘एक थी बेगम’ वेबसिरिज

लॉकडाऊनच्या काळात वेबसिरिज पाहाण्याचं प्रमाण वाढलंय. Netflix, Amazon Prime, Voot Select यांसारख्या OTT प्लॅटफॉर्म्सप्रमाणेच MX Player वरही दर्जेदार वेबसिरिज पाहायला मिळत आहेत. विशेष म्हणजे MX Player वर विनामूल्य वेबसिरिज पाहायला मिळतात. क्वीन, समांतर यांसारख्या वेबसिरीजला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. आता ‘एक थी बेगम’ ही वेबसिरिजही लवकरच प्रेक्षकांच्या बेटीला येत आहे. ‘सपना दीदी’ च्या जीवनावर ही वेबसिरिज बेतली आहे.

‘एक थी बेगम’ ही वेबसिरिज अश्रफ खान ऊर्फ सपना दीदीच्या जीवनावर आधारित आहे. कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमची हत्या हे एकमेव ध्येय बाळगलेली सपना दीदी आणि तिचे प्रयत्न यावर ही वेबसिरिज आधारित आहे. या सिरीजमध्ये सपनादीदीच्या मुख्य भूमिकेत अनुजा साठे असणार आहे. सपना दीदीचा पती दाऊदच्या गँगमध्ये होता. मात्र त्याच्या मृत्यूनंतर सपना दीदी स्वतः गुन्हेगारी क्षेत्रात शिरली. त्यानंतरचा घटनाक्रम आणि दाऊनला संपवण्याचा तिने बांधलेला चंग याचं कथानक या सिरीजमधून उलगडत जाणार आहे.

यापूर्वी बॉलिवूड दिग्दर्शक विशाल भारद्वाज सपना दीदीवर सिनेमा काढू इच्छित होते. अभिनेत्री दीपिका पदुकोण या सिनेमात सपना दीदीची भूमिका करणार होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *