विद्यार्थी संघटनांना निवडणुकीपासून दूर ठेवण्याचा डाव

जय महाराष्ट्र न्यूज, औरंगाबाद

 

राजकारणातला प्रवेश हा विद्यार्थी जिवनातूनच होतो. महाराष्ट्राला असे अनेक नेते मिळाले ज्यांनी विद्यार्थी दशेपासून राजकीय नेतृत्व दाखवलं पण आता सरकार यावरच कुऱ्हाड आणत

आहे.

 

माळी समितीच्या नावाखाली विद्यार्थ्यांना राजकारणापासून दूर करण्याचा सरकारचा डाव असल्याचा आरोप विद्यार्थी करत आहेत. राजकीय पक्षांच्या विद्यार्थी संघटनांना निवडणुकांपासून

दूर ठेवण्यास सांगण्यात आले.

 

उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. आर.एस.माळी समितीनं ही शिफारस केली. राज्य सरकारकडे ही शिफारस मंजुरीसाठी पाठवण्यात आली. पण या शिफारशीनंतर विद्यार्थी

संघटना मात्र संतापल्या आहेत. ही कृती लोकशाहीविरोधी असल्याचा आरोप विद्यार्थी संघटनांनी केला.

Exit mobile version