Tue. Oct 27th, 2020

मुंबई, पुणे, कोकण, उत्तर महाराष्ट्रात जोरदार पाऊस, मराठवाडा मात्र कोरडाच

मुंबई, पुणे, कोकण, उत्तर महाराष्ट्रात पाऊस जोरदार पडत असताना मराठवाडा मात्र अद्यापही कोरडाच असल्याचे दिसून येत आहे. मराठवाड्यात वार्षिक सरासरीच्या 28 टक्के पाऊस झाल्याने  13 मोठया पाण्याच्या प्रकल्पात आज  2. टक्के पाणी साठा शिल्लक बहुतांशी लहान व मध्यम धरण आज ही कोरडी ठाक आहेत..

धरण आणि टक्केवारी

धरण टक्केवारी
जायकवाडी 7.20
निम्न दुधना 19.19
येलदरी 28.4
सिद्धेश्वर 71.37
माजलगाव 25.22
मानार 9.80
कोळगाव 87.47
मांजरा 22.80
निम्न तेरणा 16.68
शहागड बंधारा 0.00
पेनगंगा 2.46
विष्णूपुरी 0.00
सिना कोळगाव 87.47
खडका बंधारा 6.00

मराठवाड्यात वार्षिक सरासरीच्या 28 टक्के पाऊस खरीप हंगाम संकटात आहे.  मान्सून दाखल होऊन दोन महिने होतायेत पण आज देखील मराठवाडा दमदार पावसाच्या प्रतीक्षेत  आहे.   मराठवाड्यात वार्षिक सरासरीच्या 28 टक्के पाऊस झाल्याने खरीप हंगाम संकटात आला आहे. त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे.

जिल्हा निहाय पाऊस वार्षिक सरासरी

जिल्हा पडलेला पाऊस
टक्केवारीत
औरंगाबाद 38.6
जालना 33.8
परभणी 25.2
हिंगोली 30.2
नांदेड 32.1
बीड 21.1
लातूर 24.0
उस्मानाबाद 23.8
एकूण 28.6

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *