Fri. Nov 27th, 2020

तहानलेला मराठवाडा : तब्बल 3000 टँकर्सने पाणी पुरवठा

मराठवाड्यात यावर्षीही भीषण दुष्काळाची स्थिती निर्माण झालेली आहे. मराठवाड्यातील सर्वच धरणाची पाणी पातळी खालावली आहे. लहान-मोठी धरणे कोरडीठाक पडल्यामुळे पिण्याचे पाणी कुठून आणायचे हा प्रश्न निर्माण झाला आहे. मराठवाड्यातील आठही जिल्ह्यात सध्या 3 हजार टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. बीड जिल्हा वगळता औरंगाबाद, जालना उस्मानाबाद, लातूर या भागांमध्ये चारा छावण्याची स्थिती दयनीय आहे. निवडणुकीच्या काळामध्ये सर्वच पक्षाच्या नेत्यांनी प्रचारा सोबतच दुष्काळाचे प्रश्न सोडवावा अशी मागणी होत होती. प्रत्यक्षात दुष्काळाकडे कोणीही पाहिले नसल्याचे चित्र मराठवाड्यात आहे.

मराठवाड्यात टँकर्सने पाणी पुरवठा

सध्या मराठवाड्यातील आठ जिल्ह्यात 2 हजार 470 टँकर्सने केला जात आहे.

औरंगाबाद जिल्ह्यात सर्वाधिक टँकर पाठवण्यात येत आहेत.

औरंगाबाद जिल्ह्यात जवळपास 1 हजार गावात 980 टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे.

त्यापाठोपाठ बीड जिल्ह्यात 774 टँकरने तहान भागवली जात आहे.

जालना जिल्ह्यात 446 टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे.

उस्मानाबाद जिल्ह्यात 110 टँकर सुरू आहेत

तर नांदेड जिल्ह्यात 73, लातूर जिल्ह्यात 38,

परभणीमध्ये 42 आणि हिंगोलीमध्ये 34 टँकर सध्या सुरू आहेत.

मराठवाड्यात चारा छावण्याची अशी अवस्था

मराठवाड्यात सध्या 1 हजार 14  चारा छावण्या मंजूर आहेत.

त्यातील 670 छावण्या सुरू आहेत. त्यात सर्वाधिक छावण्या या बीड जिल्ह्यात आहेत.

केवळ 4 छावण्या औरंगाबाद जिल्ह्यात सुरू झाल्या आहेत.

उर्वरित मराठवाड्यात चारा छावण्यांचा पत्ता नाही.

सध्या या छावण्यामध्ये 4 लाख 58 हजार 754 जनावरे आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *