Sat. Jun 6th, 2020

मराठवाडा मुक्ती संग्रामाबद्दल ‘हा’ इतिहास माहिती आहे का ?

भारताच्या स्वतंत्राच्या एका वर्षानंतर 17 सप्टेंबर 1948 रोजी स्वतंत्र झाला आणि भारतीय संघराज्यात सहभागी झाला. या स्वतंत्रासाठी या प्रदेशानी संघर्ष केले याला काही तोढ नाही.

भारताला 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वातंत्र मिळालं मात्र अजूनही हैदराबाद, काश्मीर आणि जुनागढ यांचा स्वतंत्र भारतात समावेश झाला नव्हता. यावेळी हैदाराबाद मध्ये निजाम मीर उस्मान अली खान बहादूर नियामुद्दौला निजाम-उल मुल्क आसफजाह यांचं राज्य होतं. मुक्ती संग्रामची सुरुवात भारतात सामील होण्यासाठी करण्यात आली होती. हैदराबाद संस्थेने स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वाखाली मुक्ती संग्रामला सुरुवात झाली.

स्वातंत्र मिळाल्यानंतरही हैदराबाद, काश्मीर आणि जुनागढला भारतात सामील करण्यात आले नसल्यामुळे स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वाखाली मुक्ती संग्राम सुरू केला.

त्यावेळी हैदराबादची लोकसंख्या 1 कोटी 60 लाख होती आणि मराठवाडा आणि कर्नाटक हैदराबादचा भाग होता.

मुक्ती संग्राम सुरु झाल्यावर निजामाच्या सेनापतींनी जनतेवर अत्याचार करण्यास सुरुवात केली.

या मुक्ती संग्रमाचे नेतृत्व हे स्वामी रामानंद तीर्थ,रविनारायण रोड्डी, दिंगबरराव बिंदू, गोविंदभाई शॉफ, भाऊसाहेब वैशंपायन,शंकरसिंग नाईक, बाबासोहेब पंराजपे, विजयेंद्र काबरा, देवीसिंग चौहान यांच्या हाती होते.

मराठवाड्याच्या प्रत्येक गावांमध्ये मुक्ती संग्राम लढला गेला.

निजामांच्या वाढत्या आत्याचारामुळे 13 सप्टेंबर 1948 रोजी पोलील ऍक्शन सुरू झाले.

मुख्य फौज सोलापूरमधून शिरल्या आणि पहाटे 4 वाजता ऑपरेशन सुरू झाल्या.

फक्त 2 तासात नळदुर्ग व सायंकाळपर्यंत तुळजापूर, परभणी ते मणिगढ, कनेरगाव, विजयवाड्याकडील बोनाकल ताब्यात घेतले.

चाळीस गावकडून आलेल्या तुकडीने कन्नड, दौलताबाद तर बुलढाण्याकडेच्या तुकडीने जालना शहर ताब्यात घेतले.

तर वरंगल, बीदर विमानतळावर भारतीय फौजांनी हल्ले केले.

15 सप्टेंबर रोजी औरंगाबाद सरकडून फौज पुढे निघाली.

यावेळी निजामी सैन्याने माघार घेण्यास सुरुवात केली होती.

हैदराबादचे सेनाप्रमुख जन अल इद्गीस यांनी 17 सप्टेंबर 1948 रोजी शरणांगती स्वीकारली आणि खुद्द निजाम शरण आला.

हैदराबाद मुक्ती संग्राम यशस्वी ठरत हैदराबाद संस्थानात तिरंगा फडकला.

हैदराबाद संस्थानातील अन्यायी राजवटीविरुध्दचा लढा मराठवाड्यातील जनतेनं यशस्वी केला.

हैदाराबाद मुक्तीसंग्राम हा अविस्मरणीय इतिहास रचला हैदाराबाद संस्थान , निजामी राजवट आणि अत्या़चाराशी संघर्ष करत मराठवाड्याने स्वातंत्र मिळविले.

स्वातंत्राच्या वर्षभरानंतर 17 सप्टेंबर 1948 रोजी स्वतंत्र झाला आणि भारतीय संघराज्यात सहभागी झाला. या स्वतंत्रासाठी या प्रदेशांनी संघर्ष केला. या संघर्षाला मानाचा मुजरा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *