Tue. Dec 7th, 2021

‘मरजावां’ चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर रिलीज

मात्र चित्रपट निर्मात्यांनी गुरुवारी मरजावां या चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर रिलीज केला आहे.

अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आणि रितेश देशमुख यांच्या चित्रपटाची उत्सुकता त्यांच्या चाहत्यांना असतेच. त्यात गेल्या काही दिवसापासून मरजावां या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत.  आताच फक्त या चित्रपटाचा पोस्टर प्रदर्शित झाला होता. तर आज चित्रपट निर्मात्यांनी गुरुवारी मरजावां या चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर रिलीज केला आहे.

मरजावां चित्रपटाची चाहत्यांना उत्सुकता

मरजावां या चित्रपटात सिद्धार्थ मल्होत्रा याचा वेगळाच अंदाज प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे.

याआधी सुद्धा अनेक चित्रपटात सिद्धार्थ मल्होत्रा याचा ‘अँग्री यंगमॅन’  हा लूक पाहायला मिळाला आहे.

‘एक विलेन’ या चित्रपटानंतर पु्न्हा एकदा रितेश देशमुख आपल्याला वेगळ्या अंदाजात दिसणार आहे.

रितेश देशमुख या चित्रपटात बुटका दाखवला गेला आहे. रकुल प्रीत सिंह एका डान्सरच्या भूमिकेत दिसणार आहे.

मरजावां या चित्रपटात अभिनेत्री तारा सुतारिया आणि सिद्धात मल्होत्रा यांची लव्हस्टोरी बघायला मिळणार आहे.

चित्रपटाचा ट्रेलर हा सस्पेन्सने संपत असल्याने या चित्रपटाबाबतीची उत्सुकता चाहत्यांमध्ये अजून वाढली आहे.

मरजावां या चित्रपट 2 ऑक्टोबरला रिलीज होणार होता, पंरतू वॉर हा चित्रपटाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली असून २९ नोव्हेंबर करण्यात आली आहे.

त्यामुळे मरजावां या चित्रपटाच्या निर्मात्यांनी 8 नोव्हेंबरला हा चित्रपट प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *