Wed. Jul 28th, 2021

गुप्तधनाची आस, सासरच्यांचा त्रास!

लग्न झाल्याच्या दुसऱ्या दिवसापासून गुप्तधनासाठी नवविवाहिताला त्रास देण्याचा प्रकार चंद्रपुर जिल्ह्यातील सावरी येथे उघडकीस आलाय. या मुळे सावरी गावात एकच खळबळ उडाली आहे.

एका दर्ग्यावर कासवाची पूजा करणे

कासवाला मुरमुरे खाऊ घालणे

त्याठिकाणी येणाऱ्या नागाची पूजा करणे

यासाठी जबरदस्ती केली जात होती.

रोज पहाटे 3 वाजेपासून दुपारी 3 वाजेपर्यंत त्या विवाहितेला उपाशी ठेवत होते.

एखाद्या वेळी भूक लागली की त्यांला मारहाण करणं, अंगावर चटके देणं असा प्रकार सुरु होता.

मात्र काही महिन्यांनंतर त्या विवितेला दिलेला त्रास सहन असह्य झाला आणि तिने पोलिसात तक्रार केली.

परंतु त्याची दखल पोलिसांनी न घेतल्याने शेवटी सविताने अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडे सर्व प्रकार सांगितला.

याची दखल घेत अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष यांनी चंद्रपुरात पत्रकार परिषद घेऊन झालेली घटना स्पष्ट केली. जिल्हा पोलीस अधीक्षक यांना तक्रार दिली. याची दखल घेत अघोरी विद्या करणाऱ्या सावरी येथील गुणवंत कारेकार या परिवाराच्या विरोधात अंधश्रद्धा निर्मूलन कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केलाय. मात्र सासू, सासरे आणि पती फरार झाले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *