संतापजनक! शहिद निनाद यांच्या अंत्यसंस्कारावेळी महापौरांच्या हसत रंगल्या गप्पा

जम्मू-काश्मीरमधील बडगाम येथे स्क्वॉड्रन लीडर निनाद मांडवगणे यांचा हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू झाला. त्यांच्यावर नाशिकमधील गोदावरीच्या तिरावर अंत्यसंस्कार करण्यात आले.  यावेळी वीर सुपुत्राला अखेरचा निरोप देताना नाशिककरांनी गर्दी केली होती. याचबरोबर राजकीय दिग्गज मडंळी देखील उपस्थितीत होती. यावेळी महापौरांच्या गप्पाचा व्हिडियो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

नेमकं काय प्रकरण ?

जम्मू-काश्मीरमध्ये स्क्वॉड्रन लीडर निनाद मांडवगणे यांचा हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू झाला.

नाशिकमधील गोदावरीच्या तिरावर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

निनाद यांच्या मृत्यूमुळे एकीकडे संपुर्ण नाशिकवर शोककळा पसरली होती.

तर दुसरीकडे अंत्यसंस्कारावेळी महापौरांच्या गप्पा रंगल्या होत्या.

निनाद यांच्या अंत्यसंस्कारावेळी महापौर एल.ई.डी ठेक्याबाबत गप्पा मारत असल्याचे एका व्हिडिओमधून समोर आले आहे.

हा व्हिडिओ सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

Exit mobile version