Sun. Jun 16th, 2019

‘सुपरमॉम’ मेरी कोमचा ऐतिहासिक विजय, सहाव्यांदा मिळवले सुवर्णपदक

0Shares

नवी दिल्लीत सुरु असलेल्या जागतिक बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या मेरी कोमने ऐतिहासिक कामगिरीची नोंद केली आहे. 48 किलो वजनी गटाच्या अंतिम फेरीत खेळत असताना मेरी कोमने युक्रेनच्या एच.ओखोटोचा पराभव करत सहाव्या विजेतेपदावर आपलं नाव कोरलं आहे. या ऐतिहासिक कामगिरीसह मेरी कोमने आयर्लंडच्या केटी टेलरचा 5 विजेतेपदांचा विक्रम मोडीत काढला आहे.

या सामन्याच्या पहिल्या सत्रात मेरी कोमने  संपूर्णपणे वर्चस्व गाजवत ओखोटोला पुनरागमन करण्याची संधीच दिली नाही. दुसऱ्या फेरीत ओखोटोने मेरी कोमला चांगली झुंज देण्याचा प्रयत्न केला. दुसऱ्या फेरीदरम्यान ओखोटोने मेरीला खालीही पाडले मात्र मेरीने यामधून सावरत पुन्हा एकदा दमदार पुनरागमन केले.

मेरीने सामन्यावरचे आपले नियंत्रण कायम ठेवले. अखेरीस पंचांनी एकमताने या सामन्यात मेरीला विजेता घोषित केले.

मेरी कोमच्या नावावर महिला विश्व बॉक्सिंग चॅम्पियनशिप स्पर्धेची प्रत्येकी 5 सुवर्णपदके जमा असून त्यात आज आणखी एका सुवर्णपदकाची भर पडली आहे.

मेरी कोमची ऐतिहासिक कामगिरी

  • मेरी कोमने 2002, 2005, 2006, 2008 आणि 2010च्या चॅम्पियनशिप स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले होते.
  • आताच्या अंतिम सामन्यात विजेतेपद पटकावून मेरीने ऐतिहासिक विजयाला गवसणी घातली आहे.
  • या आधी 5 वेळा सुवर्णपदक पटकावण्याचा विक्रम आर्यलंडच्या केटी टेलरच्या नावावर होता.

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *