Sat. Jul 2nd, 2022

359 मशालींच्या प्रकाशाने लखलखला प्रतापगड

शिवरायांनी ज्या किल्ल्यावर रयतेचा दुश्मन अफझल खान याचा कोथळा काढला होता, त्या पराक्रमाची गाथा सांगणारा प्रतापगड आजही आपल्याला प्रेरणा देत असतो.  या प्रतापगडावरील भवानी मातेच्या मंदिराला 2011 साली 350 वर्षे झाली होती.  तेव्हापासून येथे एक मशाल महोत्सवाची परंपरा सुरू करण्यात आली. गेली 9 वर्ष ही परंपरा अखंडीत सुरू आहे.

याही वर्षी मोठ्या उत्साहात हा ‘मशाल महोत्सवा’चा कार्यक्रम पार पडला.

या महोत्सवात नेत्र दीपवून टाकतो तो शेकडो मशालींचा लखलखाट…

ललिता पंचमीनिमित्तसकाळी तुळजा भवानीची पूजा होती.

रात्री आठ वाजता ढोल ताशांच्या गजरात ‘जय भवानी जय शिवाजी, छत्रपती शिवाजी महाराज की जय’, असा जयघोष करत मशाली प्रज्वलित करण्यात येतात.

यावर्षी या महोत्सवात सुमारे 359 मशालींनी पुर्ण प्रतापगड उजळला होता.

या महोत्सवा दरम्यान फटाक्यांची आतिशबाजीही करण्यात आली.

मशालीच्या उजेडात किल्ले प्रतापगडाचे वेगळ रुप पर्यटकांना पहायला मिळाले.

हा सोहळा पाहण्यासाठी दरवर्षी प्रमाणे याहीवर्षी पर्यटकांची मोठी गर्दी पहायला मिळाली.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.