Fri. Sep 30th, 2022

जैशचा म्होरक्या मसूद अझहर आंतरराष्ट्रीय दहशतवादी म्हणून घोषित

14 फेब्रुवारी रोजी झालेल्या पुलवामा हल्ल्यासह अनेक हल्ल्याचा मास्टरमाईंड आणि जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या मसूद अझहरला आंतराष्ट्रीय दहशतवादी म्हणून जाहीर करण्यात आले आहे. संयुक्त राष्ट्राच्या बैठकीत हा निर्णय घेतला असल्याचे समजते आहे. पुलावामा हल्ला झाल्यानंतर भारताने संयुक्त राष्ट्रात मसूद अझहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी जाहीर करण्याची मागणी केली होती. मात्र संयुक्त राष्ट्रात चीनने मोठा अडथळा निर्माण केला होता. तसेच इतर देशांनी दहशतवादी जाहीर करण्यास चीनवर दबाव टाकत असल्याने चीनने विरोध मागे घेतला आहे.

नेमकं प्रकरण काय ?

भारातात अनेक दहशतवादी घडवून आणणारा तसेच जैश-ए-मोहम्मद दहशतवादी संघटनेचा म्होरक्या मसूद अझहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी जाहीर केले.

गेल्या अनेक महिन्यांपासून भारताने संयुक्त राष्ट्रात मसूदला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्याची मागणी केली होती.

मात्र चीनने विरोध केल्यामुळे मोठा अडथळा निर्माण झाला होता.

संयुक्त राष्ट्रांमधील देशांनी चीनवर दबाव टाकल्यामुळे चीनने विरोध मागे घेतल्याचे समजते आहे.

संयुक्त राष्ट्राची आज बैठक झाली.

या बैठकीत मसूदला आंतरराष्ट्रीय दहशतवादी जाहीर केल्यामुळे भारताला मोठा आनंद झाला आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.