Tue. Aug 3rd, 2021

पाकिस्तानचा पर्दाफाश: मसूद अझहर जिवंत

काश्मीरमधील पुलवामा येथे १४ फेब्रुवारी रोजी सीआरपीएफच्या ताफ्यावर भ्याड दहशतवादी हल्ला करण्यात आला.

या हल्ल्यात केंद्रीय राखीव पोलीस दलाचे ४० पेक्षा अधिक जवान शहीद झाले होते.

या हल्ल्याची जबाबदारी जैश ए महम्मद या दहशतवादी संघटनेने घेतली.

या संघटनेचा म्होरक्या मसूद अझहरचा मृत्यू  झाल्याची चर्चेेच वृत्त प्रसारमाध्यमांनी प्रसारित केलं होत.

पण भारताचा सर्वांत मोठा शत्रू मसूद अझहर जिवंत असल्याची माहिती समोर येत आहे.

पाकिस्तानी लष्काराने रविवारी संध्याकाळी 7.30 च्या सुमारास त्याला रावळपिंडीच्या रूग्णालयातून बहावलपूरमधील गोथ गन्नी येथील जैश-ए-मोहम्मदच्या तळावर हलवण्यात आलं आहे.

त्यामुळे अझहरचा मृत्यू झाला नसल्याचं सांगण्यात येत आहे.

मसूद अझहर जिवंत

मोस्ट वॉंन्टेड दहशतवादी मसूद अझहर जिवंत आहे.भारतीय वायू दलाने केलेल्या एअर स्ट्राईकमध्ये अझहरचा खात्मा झाल्याचे बोलले जात होते.

तर लिव्हर कॅन्समुळे त्याचा मृत्यू झाल्याचे ही काही माध्यामांचे म्हणणं होतं.

मात्र सुत्राच्या माहितीनुसार मसुदला रावळपिंडीच्या रूग्णालयातून बहावलपूरमधील गोथ गन्नी येथील जैश-ए-मोहम्मदच्या तळावर हलवण्यात आले आहे.

पाकिस्तानी लष्काराने रविवारी संध्याकाळी 7.30 च्या सुमारास मसुदला जैशच्या तळावर हलवले आहे.

मसूद अझहर मूत्रपिंडाच्या विकाराने त्रस्त असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

मसुदच्या सुरक्षेसाठी पाकिस्तानच्या स्पेशल सर्व्हीस ग्रुपचे 10 अतिरिक्त कमांडो तैनात करण्यात आले असल्याची माहिती आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *