Fri. Sep 20th, 2019

आजारी असल्याच्या कारणाने पाकने केली मसूद अजहरची सुटका

0Shares

जैश-ए-मोहम्मद संघटनेचा मोहरक्या मसूद अजहर आजारी असल्याच्या बहाण्याने पाकिस्तानने त्याची तुरुंगातून सुटका केल्याची माहिती समोर आली आहे. किडनीचा आजार असल्याचे सांगून पाकने मसूदला तुरुंगा बाहेर काढल्याचे म्हटलं जात आहे. त्यामुळे आता या संघटनेचा प्रमुख म्हणून अब्दुल रौफ अजहरवर जबाबदारी  सोपवण्यात आली आहे.

जैश-ए-मोहम्मद दहशतवादी संघटनेचा प्रमुख मसूद अजहरला किडनीचा आजार असल्याची माहिती समोर आली आहे.

आजारी असल्यामुळे कामकाजावर लक्ष देता येत नसल्याचे म्हटलं जात आहे.

त्यामुळे आता जैशच्या कारवायांची जबाबदारी त्याचा भाऊ अब्दुल रौफ अजहरला सोपवण्यात आली आहे.

मसूदने आतापर्यंत भारतात अनेक स्फोट केले आहेत.

2008 साली मुबंईवर हल्ला, 2016 साली पठाणकोट हल्ला, 2019 साली पुलवामा हल्ला केल्याचे समोर आले आहे.

 

 

 

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *