Jaimaharashtra news

मसूदला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्यासाठी प्रयत्न;चीनला अल्टिमेटम

14 फेब्रुवारी रोजी पुलवामा येथे सीआरपीएफच्या ताफ्यावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये 40 जवान शहीद झाले. या हल्ल्याचा म्होरक्या मसूद अझहरला भारताने आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्यासाठी मागणी केली होती. मात्र चीनने संयुक्त राष्ट्रामध्ये नकार दिल्यामुळे अडथळा निर्माण झाला होता. मात्र आता चीनवर दबाव वाढत असल्याचे समजते आहे. मसूदला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्यासाठी ब्रिटन आणि फ्रान्सने चीनवर दबाव वाढवल्याचे समजते आहे.

नेमकं प्रकरण काय ?

जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या मसूद अझहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्याची मागणी भारताने केली होती.

या मागणीला सर्व देशांनी पाठिंबा दिला असून चीनने नकार दिल्यामुळे अडथळे निर्माण झाले आहेत.

मात्र आता ब्रिटन आणि फ्रान्सने चीनवर दबाव वाढवला असल्याची माहिती समोर आली आहे.

संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत या मागणीला सर्व सदस्य देशांनी पाठिंबा दिला.

मात्र चीनने विशेषधिकार वाररून नकार देत अडथळा निर्माण केला.

23 एप्रिलपर्यंत चीनने सकारात्मक भूमिका मांडावी असे अल्टिमेटम देण्यात आले आहे.

चीनने परिषदेत पाठिंबा द्यावा यासाठी अल्टिमेटम देण्यात आले आहे.

एनएससीच्या १२६७ प्रतिबंध समितीची परिषद होणार आहे.

या परिषदेत पुन्हा याबद्दल प्रस्ताव मांडण्यात येणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

या परिषदेतून मसूदला दशतवादी घोषित करण्याची गरज पडू नये असेही सांगण्यात आले आहे.

Exit mobile version