Tue. Dec 7th, 2021

पुण्यातील मांजरी भागातील सीरम इन्स्टिट्यूट आग

पुण्यातील मांजरी भागातील सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या कार्यालयालमध्ये नव्या इमारतीला आग लागली असून ही आग दुसऱ्या मजल्यावर पसरली आहे. शिवाय अग्निशमक दलाच्या पाच गाड्या घटनास्थळी पोहचल्या असून या ठिकाणी अनेकजणाचा जमावा झाला आहे. काही महिन्यांपासून देशभरात कोरोनाने थैमान घातले आहे. त्यानंतर कोरोनाविरुद्धच्या लस निर्माण करण्यासाठी सीरमच्या कर्मचाऱ्यांनी शर्तीचे प्रयत्न केले होते. त्यानंतर एक दिलासादायक बातमी सीरम इन्स्टिट्यूट द्वारे मिळाली.

कोरोनावर लस निर्माण करण्यासाठी भारतासह जगभरातील कंपन्या प्रयत्न करत होत्या. पुण्यातल्या सीरम इन्स्टिट्यूटने देखील कोरोनावर लस उत्पादन सुरू केले होते. मात्र यात आता एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. सीरम इन्स्टिट्यूट आग लागली यानंतर अग्निशमक दल आग विझवण्याचे प्रयत्न करत आहे. ‘कोविशिल्ड’उत्पादन हे सीरम इन्स्टिट्यूट करत आहे. ही आग लागल्यानं कोरोनाच्या लस उत्पादन अडथडा निर्माण झाला आहे. ‘कोविशिल्ड’ लसीचं उत्पादन सुरू असलेलं ठिकाण सुरक्षित असून आग ही बीसीजी लस बनवण्याच्या इमारतीला आग लागली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *