Mon. Jan 17th, 2022

मानखुर्दमध्ये मंडला परिसरात भीषण आग

अग्निशामक दलाच्या १५ गाड्या घटनास्थळी दाखल…

मानखुर्दमधील मंडला परिसरात भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. मानखुर्दमध्ये मंडला परिसरात भीषण आग लागली असून त्यानंतर अग्निशामक दलाच्या १५ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहे. आगीचं नेमकं कारण अद्याप अस्पष्ट झालं नाही मात्र या अग्निशामक दलाच्या १५ गाड्या या आगेला विझवण्याचे प्रयत्न करत आहे मात्र आग इतकी भीषण आहे की, या आगेवर नियंत्रण मिळवणं हे अग्निशामक दलाला फार कठीण जात आहे. तरीही या आगेवर नियंत्रण मिळवण्याचे शर्तीचे प्रयत्न सुरू आहे. सुदैवाने कोणत्याही प्रकारची जीवित हानी झाली नाही. घटनास्थळी अग्निशमन दलाचे कर्मचारी आणि स्थानिक पोलीस दलाचे कर्मचारी हजर झाले आहेत. ही ऑइल च्या गोडाऊनला आग लागलेली आहे.

या मंडाला परिसरात मोठी झोपडपट्टी आहे. येथील मायाक्का देवीच्या मंदिरा शेजारील एका दुकानात लाग लागली आणि पुढे ही आग मोठ्या प्रमाणात पसरत गेली. दुपारी 2:40 च्या सुमारास आग लागली. परिसरात दाटीवाटीने झोपडपट्टी असल्यानं अग्निशमन दलाला घटनास्थळी पोहोचण्यासाठी अडथळे निर्माण झाले. आगीचं स्वरुप भीषण असून अग्निशमन दलाच्या तब्बल 15 गाड्या आग विझवण्याचं काम करत आहेत. याच बरोबर शेजारील लाकडाची दुकानें आणि अन्य सामान सुरक्षित घटना स्थळी हलवण्यात येत आहेत. आग मोठ्या प्रमाणावर पसरत असल्यानं परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वस्ती दाट असल्यानं ही आग अधिकच भडकत असल्याचं समोर येत आहे. दरम्यान, परिसरात धुरांचे मोठे लोट आकाशाकडे जाताना दिसत आहेत. परिसरात सर्वत्र धुराचे वातावरण निर्माण झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *