Sat. Apr 20th, 2019

मास्टर दीनानाथ मंगेशकर पुरस्कार जाहीर

8Shares

गेल्या 30 वर्षांत आपली आगळी-वेगळी ओळख बनविणाऱ्या पुणे स्थित आणि नोंदणीकृत चॅरिटेबल संस्था मास्टर दीनानाथ मंगेशकर स्मृती प्रतिष्ठानद्वारे यावेळी संगीत, नाट्य, कला आणि सामाजिक क्षेत्रातील विविध व्यक्तींना सन्मानित केले जात आहे. प्रतिष्ठित मंगेशकर कुटुंबाकडून प्रत्येक वर्षी दिले जाणारे हे पुरस्कार या वेळी बुधवारी, म्हणजेच २४ एप्रिल, २०१९ रोजी मुंबई येथील षणमुखानंद हॉल येथे देण्यात येणार आहेत. सीआरपीएफचे डायरेक्टर जनरल श्री विजयकुमार हे कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी असतील आणि यावर्षीच्या विजेत्यांना आरएसएस प्रमुख माननीय श्री मोहन भागवत यांच्या हस्ते हे पुरस्कार देण्यात येतील.  या पुरस्कारांची घोषणा करताना, हृदयनाथ मंगेशकर आणि उषा मंगेशकर यांनी सांगितले, “एक गायक, संगीतकार आणि मंच कलाकार म्हणून मास्टर दीनानाथचे अमूल्य योगदान स्मृती मंगेशकर कुटुंब प्रत्येक वर्षी मास्टर दीनानाथ मंगेशकर स्मृती प्रतिष्ठान पुरस्कार आयोजित करतो ज्याद्वारे विशिष्ट व्यक्तींना सन्मानित केले जाते. आम्हाला या गोष्टीचा आनंद आहे की, हे आमच्या या अद्वितीय कार्यात सगळ्याच लोकांकडून भरपूर मदत मिळत राहिली आहे.”

मास्टर दीनानाथ मंगेशकर पुरस्काराचे मानकरी

संगीत आणि कला क्षेत्रातील नामवंत शास्त्रीय नृत्यांगणा  –  श्रीमती सुचेता भिडे-चापेकर

मास्टर दीनानाथ मंगेशकर जीवनगौरव पुरस्काराचे मानकरी –  श्री सलीम खान

भारतीय चित्रपटसृष्टीत महत्वपूर्ण योगदानासाठी विशेष पुरस्कार –  श्री मधुर भंडारकर

 

चित्रपटसृष्टीत बहुमूल्य योगदानासाठी सन्मानित – श्रीमती हेलन

साहित्य क्षेत्रात वागविलासिनी पुरस्काराचे मानकरी – श्री वसंत आबाजी डहाके

मोहन वाघ पुरस्काराने वर्षातील सर्वोत्तम नाटक – भद्रकाली प्रॉडक्शनचे ‘सोयारे सकाळ’

सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानासाठी आनंदमयी पुरस्काराचे मानकरी- तालयोगी आश्रमचे पंडित सुरेश तळवळकर

‘भारत के वीर’ पुरस्कारासाठी- सीआरपीएफ डायरेक्टर जनरल श्री विजयकुमार

आमच्या प्रतिष्ठानाने या वेळी हा पुरस्कार जम्मू-काश्मीरच्या पुलवामा हल्ल्यात शहिद ४० पेक्षा अधिक सीआरपीएफच्या जवानांना समर्पित करण्याचे ठरविले आहे. या कार्यक्रमात शहीदाना श्रद्धांजली स्वरूप लता दीदी, त्यांच्या पिता मास्टर दीनानाथ यांच्या स्मृतीत ,एक कोटी रुपये दान म्हणून देतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *