Thu. Sep 29th, 2022

‘बुलीबाई’ ऍप चालवणाऱ्या श्वेता सिंहला बेड्या

मुंबई पोलिसांच्या सायबर सेलने बुल्ली बाई ऍपवर कारवाई केली असून बुल्ली बाई ऍप हाताळणाऱ्या तरुणीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मुंबई पोलिसांनी उत्तराखंडमधून १२वी उत्तीर्ण असलेली श्वेता सिंह या तरुणीला अटक केली आहे. श्वेता सिंह ही तरुणी १८ वर्षांची असून हीच तरुणी बुल्ली बाई ऍपची मास्टरमाईंड आहे का? असा सवाल उपस्थित होत आहे.

याविरोधात सोमवारी मुंबई पोलिसांच्या सायबर सेलने ‘बुल्लीबाई’ अॅप संदर्भात बंगळुरू येथील एका २१ वर्षीय तरुणाला ताब्यात घेतले. त्याची १० तास चौकशी केली असून या चौकशीतून इतर सूत्रधारांचा पर्दाफाश होण्याची शक्यता आहे. पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुद्ध आयपीसी आणि आयटी कायद्याच्या संबंधित कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

वेगवेगळ्या क्षेत्रातील प्रसिद्ध मुस्लीम महिलांचे फोटो गिटहब नावाच्या ऑनलाईन ऍपवर अपलोड करून आक्षेपार्ह मजकूर प्रसिद्ध केल्याने देशभरात एकच खळबळ उडाली आहे. याच प्रकरणात पश्चिम प्रादेशिक सायबर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. दिल्लीतील एका महिलेने अशाप्रकारे प्रसिद्ध केलेले फोटो ट्विटरवर शेअर केले. त्यानंतर, हा प्रकार समोर आला. या महिलेने दिल्ली पोलिसांमध्ये तक्रार केली. हाच मुद्दा शिवसेनेच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी उचलून धरत मुंबई पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली आहे. तसेच आरोपींना लवकरात लवकर अटक करण्याची मागणीदेखील केली होती.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.