Sun. Apr 5th, 2020

नेरळ माथेरान दरम्यान रेल्वे स्थानकांचे पालटले रुप

जय महाराष्ट्र न्युज, मुंबई

नेरळ-माथेरान दरम्यान मिनीट्रेन सुरू झाली तेंव्हापासून पर्यटकांच्या सेवेत असलेले वाफेचे इंजिन आजही पर्यटकांच्या सेवेत आहे.या वाफेवर चालणाऱ्या इंजिनाचे विदेशी पर्यटकांना असलेले आकर्षण पाहता पर्यटकांच्या मागणीनुसार खास सफर अमन लॉज-माथेरान दरम्यान घडविली जाणार आहे.त्याचबरोबर नेरळ माथेरान दरम्यान असलेल्या रेल्वे स्थानकांचे सुशोभीकरण केले असून प्रवाशांच्या सुविधांसाठी सज्ज केले आहे.

यासाठी मध्य रेल्वेचे महाप्रबंधक यांनी माथेरान स्थानक तसेच माथेरानच्या राणीला जागतिक हेरिटेज दर्जा मिळवुन देण्याकरीता रेल्वे प्रशासना कडुन युद्ध पातळीवर नेरळ माथेरान स्थानका दरम्यान रेल्वेच्या कामांना गती देण्यात आली अाहे.यासाठी वर्ल्ड हेरिटेज दिनाचे औचित्य साधुन१८ एप्रिल रोजी माथेरान पाहणी दौऱ्या दरम्यान रेल्वे प्रशासनाने वाफेचे इंजिन असलेल्या मिनी ट्रेनचा प्रवासी सेवेकरीता शुभारंभ पार पाडला आहे.

ब्रिटिश काळातील दोन जर्मन बनावटीची कोळशावरची इंजिन मध्ये रेल्वेने डीजेलमध्ये परीवर्तीत करुन वाफेचं इंजिन तयार केली. वाफेचे इंजिन असलेल्या मिनी ट्रेन मधुन विलक्षण सफर घडविण्यासाठी येत्या उन्हाळी पर्यटन हंगामात पर्यटकांसाठी रुळावर आणले जाऊ शकते.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *