Mon. Aug 8th, 2022

माथेरानच्या राणीला अडचणींचा ब्रेक

जय महाराष्ट्र न्यूज, माथेरान

 

माथेरानची राणी मिनीट्रेन सुरू करण्याच्य रेल्वे प्रशासनाच्या हालचाली सुरू असताना अनेक कारणांनी याला ब्रेक लागत आहे.

 

मुसळधार पावसात  माथेरान मिनीट्रेनच्या मार्गात दरडी कोसळल्यानं मिनी ट्रेनच्या मार्गात अडचणी निर्माण झाल्या आहेत.

 

कोसळलेल्या दरडींच्या ढिगाऱ्याखाली माथेरानचा मार्ग दबला गेला आहे. वर्षभरापासून बंद असलेली मिनी ट्रेन पुन्हा सुरु करावी यासाठी चारी बाजूनी दबाव वाढत

असताना कधी इंजिनमधील त्रुटींमुळे तर कधी डब्ब्यांमुळे मिनीट्रेन सुरु होऊ शकली नाही. 

 

मिनीट्रेन पुन्हा सुरु करण्याच्या दृष्टीनं तांत्रिक दोष दूर करण्याचे प्रयत्न करीत असताना आता निसर्गाने देखील अडचणी उभ्या केल्या आहेत. गुरुवारी जोरदार पाऊस

झाला.

 

या मुसळधार पावसामुळे रेल्वे रुळावर दरडी कोसळल्या आहेत. अनेक ठिकाणी रुळावर माती वाहून आली आहे तर काही ठिकाणी मोठं मोठे दगड दरडींच्या रूपाने खाली

आले आहेत.

 

रेल्वेच्या कर्मचाऱ्यांनी याची पाहणी केली असून या दरडी तात्काळ हटविण्याचे काम देखील सुरु करण्यात येणार आहे. अशा अनेक अडचणींवर मात करून मिनी ट्रेन

लवकरात लवकर सुरु करण्याचे आव्हान रेल्वे प्रशासनासमोर आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.