Sat. Jul 31st, 2021

रेल्वे स्थानकावर विकृताकडून तरुणीशी छेडछाड

मुंबई महिलांसाठी सुरक्षित समजली जाते. परंतु आता खरच मुंबई महिलांसाठी सुरक्षित आहे का, असा प्रश्न विचारण्यात येत आहे.

मुंबईतील रेल्वे स्थानकावरील पादचारी पुलावर (foot over bridge)मुलीची छेड काढणारा विकृत सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे.

मुंबईतील माटुंगा ( mumbai matunga railway station ) रेल्वे स्थानकावर एक विकृत मुलीची छेड काढतानाचा व्हिडिओ समोर येत आहे. हा व्हिडिओ २६ जानेवारीचा असल्याचं सांगण्यात येत आहे.

तरुणी पादचारी पुलावरुन जात असताना या विकृताने तिचा पाठलाग केला. पाठलाग करत तिची छेड काढली. यानंतर त्या विकृताने तिथून पळ काढला.

छेड काढणाऱ्या विकृताला पोलिसांनी अटक केली आहे.

२६ जानेवारीच्या रात्रीचा हा सर्व प्रकार आहे.

हा सर्व प्रकार जेव्हा घडला, त्यावेळेस घटनास्थळी सुरक्षारक्षक तैनात नव्हते. यासर्व प्रकारामुळे मुंबईतील महिलांचा रात्रीच्या प्रवासावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

दरम्यान महाराष्ट्र जळीतकांडामुळे हादारलं आहे. औरंगाबादेतील महिलेचं उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

तर हिंगणघाट प्रकरणाच्या निषेधार्थ मोर्चा काढण्यात आला आहे. या प्रकरणामुळे महिलांच्या संतप्त प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *