Tue. Aug 9th, 2022

मावळचे शिवसैनिक आक्रमक

बुधवारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला. स्वपक्षीय आमदार फुटल्यामूळे उद्धव ठाकरे यांना राजीनामा द्यावा लागला आणि सरकार कोसळले.याचा निषेध म्हणून मावळ शिवसेनेच्या वतीने जुन्या पुणे मुंबई महामार्गा वर सकाळी ६ वाजता टायर जाळून रस्ता अड़विण्यात आला. मविआ सरकार कोसळल्याने मावळ शिवसेना आक्रमक झाली आहे. या सर्व घटनेमुळे राज्यातील शिवसैनिकांना शिवसैनिकांत प्रचंड रोष निर्माण झाला आहे. बंडखाेर शिवसैनिकांचा निषेध म्हणून मावळ शिवसेनेच्या वतीने आज जुन्या पुणे मुंबई महामार्गावर सकाळी टायर जाळून रस्ता अड़विण्यात आला.मावळ शिवसेना यांनी बंडखोर आमदारांचा निषेध केला आहे

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तातडीने मंत्रीमंडळाची बैठक बोलावली होती सर्व मंत्री उपस्थित होते. आज होणाऱ्या बहुमत चाचणीपूर्वी मंत्रीमंडळाची ही शेवटची कॅबिनेट ठरली. कालच्या बैठकीनंतर उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. तर त्याच बरोबर त्यांनी विधान परिषद सदस्यत्व सोडले आहे.

कोर्टाच्या निर्णयानंतर ठाकरे यांनी महाराष्ट्राला संबोधन करत मोठा निर्णय घेतला. मी मुख्यमंत्रीपदाचा त्याग करत असल्याचं त्यांनी म्हंटले आहे .बुधवारी रात्री साडेनऊ वाजता त्यांनी त्यांच्या राजीनाम्याची घोषणा केली.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुधवारी उशीरा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवन येथे भेट घेऊन मुख्यमंत्री पदाचा राजीनामा सुपूर्द केला.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.