Wed. Jun 29th, 2022

‘मविआला सुडाचं राजकारण करायचंय’ – देवेंद्र फडणवीस

तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेख राव यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. याबाबत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. एक मुख्यमंत्री दुसऱ्या मुख्यमंत्र्यांना भेटणे हे काही नवीन नाही. या भेटीने काहीही फरक पडणार नाही. तसेच राज्यात महाविकास आघाडी सरकारचे सुडाचे राजकारण सुरू आहे, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

औरंगबाद येथे माध्यमांशी बोलताना देवेंद्र फडणवीसांनी मविआ सरकारवर निशाणा साधला. ते म्हणाले, एखाद्या राज्याचा मुख्यमंत्री दुसऱ्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना भेटत असतो. यामध्ये काही नवीन नाही. मी मुख्यमंत्री असताना, चंद्रशेखर राव मलाही भेटले होते. त्यामुळे त्यांच्या भेटीने काहीही फरक पडणार नाही. यापूर्वीही विरोधकांनी आघाडीचे प्रयोग केले होते, मात्र त्यांचा प्रयोग फसला, अशी टीका फडणवीसांनी केली आहे.

महाविकास आघाडी सरकार राज्यात सुडाचे राजकारण करत आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर काय कारवाई झाली, भाजप नेते किरीट सोमय्यांचा जीव घेण्याचा प्रयत्न करण्यात आला, आमदार रवी राणांबाबत काय चालले आहे, त्यामुळे सुडाचे राजकरण कोण करत आहे, हे जनता पाहत आहे, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

2 thoughts on “‘मविआला सुडाचं राजकारण करायचंय’ – देवेंद्र फडणवीस

  1. My sis informed me about your website and the way great it is. She’s proper, I am actually impressed with the writing and slick design. It appears to me you’re just scratching the floor by way of what you may accomplish, but you’re off to an excellent begin!

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.