‘मविआ कार्यकाळ पूर्ण करून पुन्हा सत्तेत येईल’ – शरद पवार

दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट झाली. संसदेतील पंतप्रधान कार्यालयात पवार-मोदी यांच्यात भेट झाली. या भेटीनंतर शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी लक्षद्विपचे राष्ट्रवादीचे खासदार मोहम्मद के फैजल उपस्थित होते.
लक्षद्वीपमधील प्रश्नांवर पंतप्रधानांसोबत चर्चा
यावेळी शरद पवारांनी लक्षद्विपमधील काही प्रश्नांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत चर्चा केली असल्याचे सांगितले. तसेच खासदार फैजल यांनी मोदींसोबत लक्षद्वीपबाबत चर्चा केल्याचेही ते म्हणाले. लक्षद्विपमध्ये प्रशासकाकडून नागरिकांना त्रास देण्यात येत आहे. स्थानिकांचा विरोध असतानाही त्यांच्या जमिनीवर प्रोजेक्ट उभारले जात आहेत. नागरिकांच्या जमिनी बळकवण्यात येत आहेत. तसेच लक्षद्विपमध्ये नागरिकांना वैद्यकीय समस्यांना सामोरे जावे लागत आहेत, याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी यांची भेट घेतली असल्याचे शरद पवारांनी सांगितले आहे.
संजय राऊतांच्या ईडीकारवाईबाबत चर्चा
विधानपरिषदेच्या १२ आमदारांच्या मुद्द्यावरही पंतप्रधान मोदींसोबत चर्चा झाली असल्याचे शरद पवारांनी सांगितले आहे. १२ आमदारांच्या नियुक्तीवरून अद्याप राज्यपालांचा निर्णय आला नसल्याचे ते म्हणाले. शिवसेना खासदार संजय राऊत हे राज्यसभा सदस्य आहेत. त्यांच्यावर झालेल्या ईडीकारवाईबाबतही पंतप्रधानांसोबत चर्चा केली आहे. संजय राऊत यांच्यवरील कारवाईबाबत पंतप्रधान मोदी निश्चित निर्णय घेतीलस, असेही पवार म्हणाले. राष्ट्रवादी शिवसेना हे भाजप विरोधात उभी होती मात्र, राष्ट्रवादी कधीच भाजपसोबत नव्हती असेही ते म्हणाले.
मविआ कार्यकाळ पूर्ण करून पुन्हा सत्तेत येईल
महाविकास आघाडी सरकारची अडीच वर्षे यशस्वीरीत्या पूर्ण झाली असून पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करून पुन्हा मविआ सत्तेवर येणार असल्याचा विश्वासही शरद पवार यांनी व्यक्त केला आहे. तसेच राष्ट्रवादीचे मंत्री बदलणार नसल्याचेही शरद पवार म्हणाले आहेत. तसेच राज ठाकरे यांच्या भूमिकेवरही पवारांनी भाष्य केले आहे. राज ठाकरे पूर्वी भाजपविरोधात होते. मात्र आता ते बदलले असल्याचे पवार म्हणाले.
Great amazing issues here. I am very glad to look your post. Thank you so much and i’m looking ahead to touch you. Will you please drop me a e-mail?
Thanks for every other magnificent post. Where else may anyone get that kind of info in such
a perfect manner of writing? I have a presentation subsequent week,
and I’m on the look for such info.