‘मविआचा मराठी पाट्यांचा पुळका बेगडी’ – चित्रा वाघ

राज्यतील दुकानांचे नामफलक हे मराठीत असण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकित घेण्यात आला आहे. दरम्यान, राज्य मंत्रिमंडळाच्या या निर्णयामुळे विरोधक महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधत आहेत. भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी मविआ सरकावर टीका केली आहे. मविआचा मराठी पाट्यांचा पुळका बेगडी, अशी टीका चित्रा वाघ यांनी केली आहे.
डीपीडीसीच्या बैठकीत शिवसेनेचे मंत्री आदित्य ठाकरे आणि खासदार प्रियंका चतुर्वेदी इंग्रजीमध्ये चर्चा करत होते. यांची ही इंग्रजी चर्चा वादाचे कारण ठरली आहे. बैठकीमध्ये आदित्य ठाकरे आणि प्रियंका चतुर्वेदी यांनी इंग्रजीमध्ये चर्चा केल्यामुळे, त्यांचे मराठी प्रेम हे बेगडी असल्याची टीका भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी केली ट्विट करत केली आहे. तसेच आदित्य ठाकरे यांनी माय मराठीची माफी मागावी अशी मागणी चित्रा वाघ यांनी केली आहे. तर प्रियंका ताईंना अस्सल मराठी शिकवा असा टोलाही चित्रा वाघ यांन ट्विटद्वारे मविआवर लगावला आहे.
चित्रा वाघ यांनी ट्विट केले की, ‘ठाकरे सरकारने मराठी पाट्या लावण्याचा निर्णय घेतला पण डीपीडीसीच्या बैठकीत शिवसेनेचे मंत्री आदित्य ठाकरे आणि खासदार प्रियंका चतुर्वेदी इंग्रजीत चर्चा करत आहेत, किती हा बेगडीपणा… आदित्यजी माय मराठीची माफी मागा व प्रियंकाताईंना अस्सल मराठीही शिकवा.. जनताजनार्दन हो, शक्कल लढवा नि अस्सल ओळखा..!’
ठाकरे सरकारनं मराठी पाट्या लावण्याचा निर्णय घेतला पण DPDC च्या बैठकीत शिवसेनेचे मंत्री @AUThackeray आणि खासदार@priyankac19 इंग्रजीत चर्चा करताहेत
किती हा बेगडीपणा…आदित्यजी माय मराठीची माफी मागा व प्रियांकाताईंना अस्सल मराठीही शिकवा..
जनताजनार्दन हो
शक्कल लढवा नि अस्सल ओळखा..! pic.twitter.com/UFtdU8HHp2— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) January 14, 2022
I truly like the fresh perpective you did on the issue. Truly was not expecting that when I started off studying. Your concepts were simple to understand that I wondered why I never looked at it prior to. Glad to know that theres an individual out there that definitely understands what hes discussing. Great job