अवघ्या 21 व्या वर्षी ‘हा’ बनला न्यायाधीश

जयपूर : शहरातील 21 वर्षाचा तरुण न्याधीशपदाची परीक्षा पास झाला आहे. मयंक प्रताप सिंह असं या 21 वर्षीय तरुणाचं नाव आहे. मयंक न्याय विधी सेवा 2018 च्या परीक्षेत उत्तीर्ण झाला आहे. त्यामुळे देशाला सर्वात कमी वयाचा न्यायाधीश मिळाला आहे. वयाच्या अवघ्या 21 व्या वर्षी उल्लेखनीय कामगिरी केल्याने मयंकचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.

मयंकचं एलएलबीचं शिक्षणदेखील याच वर्षी पूर्ण झालं आहे. मयंकने आपल्या एलएलबीचं शिक्षण राजस्थान विद्यापीठातून पूर्ण केलं आहे. मयंकने 2014 ला राजस्थान विद्यापीठात एलएलबीसाठी प्रवेश घेतला होता. मयंकला मिळालेल्या अभूतपूर्ण यशामुळे मला अभिमान वाटत असल्याचे मयंक म्हणाला. मयंकने आपल्या हितचिंतकाचें आभार मानले आहेत.

“विधी सेवेच्या 2018 च्या परीक्षेसाठी अर्ज करणाऱ्यांसाठी वयाची अट 23 इतकी होती. पण राजस्थान उच्च न्यायालयाने ही वयोमर्यादा 2 वर्षाने कमी करुन 21 इतकी केली. राजस्थान उच्च न्यायालयाने वयोमर्यादा कमी केल्याने मला परिक्षा देता आली”, असे मयंक म्हणाला.

Exit mobile version