विश्वनाथ महाडेश्वर सरांनी माझा विनयभंग केला नाही ‘त्या’ महिलेचा व्हिडीओ व्हायरल

मुंबईत सलग पाऊस पडल्यानंतर मुंबईची हालत बिघडते. याचा जाब विचारण्यास गेलेल्या महिलेचा हात मुंबई महानगरपालिकेचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर पिरगळताना व्हिडीओ आला होता. विश्वनाथ महाडेश्वर सरांनी माझा विनयभंग केला नाही तर पोलीसांकडे तक्रार दाखल करण्यासाठी माझ्याकडे राजकीय पक्षांनी आग्रह धरला होता. असा खुलासा त्या महिलेने केला आहे.

त्या महिलेचा खुलासा

मुसळधार पावसामुळे सांताक्रूजमधल्या अनेक घरांमध्ये पाणी शिरलं होतं. यामध्ये 45 वर्षीय महिलेचा विजेचा शॉक लागून मृत्यू झाला. तिला वाचवण्याचा प्रयत्न करणाऱ्या तिच्या 26 मुलाचाही शॉक लागून मृत्यू झाला. या घटनेनंतरही स्थानिक नगरसेवकांनी भेट दिली नाही.याचा स्थानिकांमध्ये रोष होता.

बुधवारी महापौर जेव्हा भेट द्यायला आले, तेव्हा स्थानिक महिलांनी त्यांना घेराव घातला.त्यावेळी महापौरांनी एका महिलेचा हात पिळला. खुद्द महापौरांनीच महिलेचा विनयभंग केल्यामुळे संताप व्यक्त केला गेला. संताक्रूज मध्ये महापौरांनी एका महिलेचा हात मुरगळल्याचा विडिओ व्हायरल झाल्या नंतर महापौरांनी मात्र त्याच स्पष्टीकरण दिल होतं.

व्हिडिओ मध्ये महापौरांनी हात मुरगळल्याच दिसत असतानाही मी हात पकडला नव्हता, असं महाडेश्वर यांनी म्हटलं होतं. मी शिक्षक आहे मला महिलेशी कस वागायचं हे समजतं. असा पद्धतीने वागणं ही शिवसेनेची संस्कृती नसल्याचं महापौरांनी म्हटलं होतं. तर विश्वनाथ महाडेश्वर सरांनी माझा विनयभंग केला नाही तर पोलीसांकडे तक्रार दाखल करण्यासाठी माझ्याकडे राजकीय पक्षांनी आग्रह धरला होता. असा खुलासा त्या महिलेने केला आहे.

महापौर विश्वनाथ महाडेश्वर सरांनी माझा हात पिरगळला नाही. त्यांनी माझा विनयभंग केलेलाच नाही. त्यामुळे त्यांच्याविरोधात पोलीसांकडे तक्रार करण्याचा प्रश्नच येत नाही, अशा शब्दात सांताक्रूज आंदोलनातील त्या महिलेने आपली भूमिका मांडली आहे.

Exit mobile version