Wed. Oct 27th, 2021

मयूर शेळकेंनी पुन्हा जिंकली सगळ्यांची मनं

वांगणी रेल्वे स्थानकात आईसोबत फलाटावरून जात असताना रुळांवर पडलेल्या मुलाचा जीव वाचवणारे देवदूत मयूर शेळके यांनी पुन्हा एकदाचर्चेत आले आहेत.स्वत:चा जीव धोक्यात घालून मयूर यांनी चिमुकल्याचे प्राण वाचवले होते. मयूर यांनी दाखवलेल्या धाडसाचं रेल्वेमंत्री पियूष गोयल यांनीदेखील कौतुक केलं. रेल्वेकडून मयूर यांना ५० हजारांचं बक्षीस देण्यात आलं. यातील अर्धी रक्कम मयूर त्यांनी वाचवलेल्या मुलाच्या आईला देणार आहेत.

संगीता शिरसाट ह्या वांगणी रेल्वे स्थानकाच्या फलाटावरून चालल्या होत्या. संगीता आणि त्यांचा मुलगा अंध आहेत. त्यामुळेच फलाटाचा अंदाज न आल्यानं संगीता यांचा मुलगा रेल्वे रुळांवर पडला. तितक्यात समोरून भरधाव रेल्वे येत होती. त्यावेळी कर्तव्यावर असलेले पॉईंटमन मयूर शेळके यांनी स्वत:च्या जीवाचा विचार न करता धाव घेतली आणि मुलासह फलाटावर उडी घेतली. हा संपूर्ण थरार सीसीटीव्हीत कैद झाला.

‘मला बक्षीस म्हणून मिळालेल्या रकमेतील अर्धी रक्कम संगीता शिरसाट यांना देण्याचा निर्णय मी घेतला आहे. शिरसाट यांच्या कुटुंबाची आर्थिक स्थिती बेताची असल्याचं मला समजलं. त्यामुळे मी हा निर्णय घेतला आहे. ही रक्कम संगीता यांच्या मुलाच्या शिक्षणासाठी उपयोगी ठरेल’,असं शेळके यांनी सांगितलं. त्यांनी दातृत्त्वाचं दर्शन घडवत पुन्हा एकदा सर्वांची मनं जिंकली आहेत.

संपादन – सिद्धी भरत पाटील

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *