MDH मसालाचे मालक धर्मपाल गुलाटी यांचं निधन
भारताने एक अनुभवी आणि यशस्वी उद्योजक गमावला.

MDH मसालाचे मालक धर्मपाल गुलाटी यांचं नवी दिल्लीमध्ये गुरूवारी रुग्णालयात हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले ते ९८ वर्षांचे होते. गुलाटी यांच्यावर दिल्लीतील रुग्णालयामध्ये मागील तीन आठवड्यांपासून उपचार सुरु होते. आज पहाटे त्यांचं निधन झाले. गुलाटी हे मसाल्यांचे बादशाह म्हणून जगप्रसिद्ध होते.
‘महाशियां दी हट्टी’ ही मसाल्याच्या पदार्थांचे उत्पादन करणारी कंपनी ‘एमडीएच’ या नावाने प्रसिद्ध आहे. गुलाटी यांच्या निधनामुळे भारताने एक अनुभवी आणि यशस्वी उद्योजक गमावल्यानं सोशल मीडियावर नेटकऱ्यांद्वारे दुख व्यक्त केल्या जात आहे.
‘एमडीएच’ मसाले कंपनी ही त्यांच्या कष्टानी त्यांनी मोठी केली. धर्मपाल गुलाटी यांचा जन्म पाकिस्तानमधील सियालकोट येथे झाला होता. फाळणीनंतर त्यांचे कुटुंब दिल्लीत स्थायिक झाले. पोटा पाण्याच्या प्रश्नासाठी त्यांनी सुरूवातीला सायकल रिक्षा चालवून उदरनिर्वाह केला. दिवस असेच लोटत गेली त्यानंतर त्यांनी मसाल्यांचा उद्योग त्यांनी सुरु केला. आज भारतातच नव्हे तर जगभरात ‘एमडीएच’ मसाले हा एक मोठा नावाजलेला ब्रँड आहे.
चुन्नीलाल गुलाटी यांच्या अथक प्रयत्नांमुळे ‘एमडीएच’ कंपनीने मसाल्याच्या पदार्थांमध्ये बाजारात एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. महाशय धरमपाल गुलाटी यांचे पुत्र राजीव गुलाटी आता व्यवसाय सांभाळत आहे.