Jaimaharashtra news

गोवर लशीमुळे लहान मुलांचे कोरोनापासून संरक्षण?

पुणे: गोवर लस लहान मुलांना कोरोनाच्या संक्रमणापासून संरक्षण देत आहे असा दावा पुण्यातील बी.जे. मेडिकल कॉलेजच्या संशोधकांनी केला आहे. बी.जे. मेडिकल कॉलेजच्या संशोधकांनी वय १ ते १७ वयाच्या ५४८ मुलांवर याबाबत अभ्यास केला. ५४८ मुलांमध्ये दोन गट बनविण्यात आले होते. यामध्ये जी मुले कोरोनाबाधित झाली आहे. अशा काही मुलांच्या गटाला गोवर लस देण्यात आली तर काही बाधित मुलांच्या दुस-या गटाला गोवर लस देण्यात आली नाही. संशोधकांना आढळले की ज्या कोरोना बाधित मुलांना गोवर लस देण्यात आली आहे, त्या मुलांमध्ये कोरोना रोगाविरूध्द लशीचा प्रभावीपणा 87.5% आढळला. संधोधकांनी दावा केला आहे कि या लशीमुळे मुलांचे कोरोना पासून संरक्षण मिळू शकते.

Exit mobile version