मुंबईची लोकल सुरू होणार?
रेल्वे आणि राज्य सरकार दरम्यान बुधवारी महत्वाची बैठक…

मुंबईची लाईफलाईन म्हणजेच मुंबईची लोकल ही २२ मार्चपासून बंद करण्यात आली होती. कोरोना विषाणूचा संसर्ग संर्सग नये यासाठी हा निर्णय घेण्यात आला होता. जेव्हा टाळेबंदीमध्ये शिथिलता करण्यात आली तेव्हा अत्यावश्यक कर्मचा-यांसाठी ही सेवा चालू ठेवली होती परंतु आता राज्य सरकारने अनलॉक ५ च्या टप्प्यात अनेक गोष्टी सुरू करण्याचे निर्णय दिले आहेत.
तसेच राज्य सरकारने आणि रेल्वे मंडळाने महिलांसाठी २१ ऑक्टोबर पासुन लोकलने प्रवास करण्याची मान्यता दिली आहे. याच पार्श्वभूमीवर बुधवारी मुंबईत महत्वाची बैठक घेण्यात येणार आहे. ही बैठक रेल्वे मंडळ आणि राज्य सरकारमध्ये होणार असुन ह्यात महत्वाचे निर्णय घेण्यात येणार असल्याची शक्यता आहे.तसेच खासगी क्षेत्रातील कर्मचा-यांनाही लोकल प्रवास करण्याची मुभा दिली जाऊ शकते त्यामुळे या बैठकीत काय निर्णय होतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.