Wed. Jun 29th, 2022

शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट

दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट झाल्याची माहिती समोर आली आहे. संसदेतील पंतप्रधान कार्यालयात पवार-मोदी यांची भेट झाली आहे. या भेटी दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शरद पवार यांच्यात २० ते २५ मिनिटे चर्चा झाली आहे.

दिल्लीतील शरद पवार यांच्या निवासस्थानी महाराष्ट्रातून आलेल्या आमदारांसाठी स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित  करण्यात आला होता. स्नेहभोजनाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे देखील उपस्थित होते. यावेळी नितीन गडकरी आणि शरद पवार यांच्यात चर्चा झाली. या स्नेहभोजनाच्या कार्यक्रमानंतर आज संसदेतील पंतप्रधान कार्यालयात शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. मात्र, अद्याप पवार-मोदी यांच्यातील भेटीचे कारण समोर आलेले नाही.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शरद पवार यांच्यात झालेल्या भेटीवर अनके राजकीय प्रतिक्रिया उमटल्या आहेत.

1 thought on “शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट

  1. Hi there very nice site!! Man .. Beautiful .. Superb .. I’ll bookmark your website and take the feeds additionally…I am happy to search out numerous useful info here in the submit, we need develop more techniques on this regard, thanks for sharing. . . . . .

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.