Tue. Aug 9th, 2022

पक्षप्रमुखांची वर्षावर बैठक

शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि राज्य सरकारमधील मंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडामुळे शिवसेनेसह राज्यातील राजकारणामध्ये खळबळ उडाली आहे. शिंदे यांनी केलेल्या बंडामुळे त्यांना गटनेते पदावरून काढण्यात आले. त्यांच्याऐवजी अजय चौधरी यांना गटनेतेपद देण्यात येईल. यावर शिंदे समर्थकांनी आक्षेप दर्शवला आहे. एकनाथ शिंदे यांनी आपली नाराजी ट्विट द्वारे व्यक्त केली आहे. नाराज एकनाथ शिंदे मंत्रिपदाचा राजीनामा देणार अशी शक्यता वर्तवता येत आहे. यामुळे एकनाथ  शिंदे  आणि  शिवसेनेत  संघर्ष वाढलेला  आहे. याविषयी पक्ष प्रमुखांनी तातडीने वर्षावर बैठक घेतली होती.  दुपारी दोन वाजता ही बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीत महाराष्ट्रातील आमदारांनी हजेरी लावली  होती.
शिवसेनेतील बंडखोरीमुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे जयंत पाटील आणि सुप्रिया सुळे यांनी उद्धव ठाकरेंच्या वर्षा या निवासस्थानी जाऊन त्यांच्याशी याविषयी चर्चा केली.

    एकनाथ शिंदेनी बंड पुकारलं तर महाविकास आघाडी सरकार कोसळण्यास वेळ लागणार नाही. या चर्चेला महाराष्ट्रात  उधाण आलेले आहे.  त्यामुळे महाराष्ट्राच्या नजरा सध्या गुजरातच्या दिशेलाच वळलेल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.