Tue. May 17th, 2022

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा हल्लाबोल

शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मुंबईतील बीकेसी मैदानात जाहीर सभा घेतली. या सभेमध्ये उद्धव ठाकरेंच्या भूमिकेकडे संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेचे लक्ष लागले होते. दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सभेत हल्लाबोल करत अनेक विषयांवर भाष्य केले तसेच विरोधकांवर निशाणा साधला.

शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे भाषण समाप्त झाले.


तसेच कायद्याचा दुरुपयोग आम्ही करत नसल्याचेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले आहे. गलिच्छ राजकारण बंद करण्याचे आवाहनही ठाकरे यांनी केले आहे.


दरम्यान, पक्षप्रमुखांनी विरोधकांवर निशाणा साधताना भाजप नेते किरीट सोमैया यांच्यावर निशाणा साधला आहे. किरीट सोमैया मविआमधील नेत्यांवर आरोप करत असताता. त्यामुळे बोबड्यांकडे बघू नका, असा घणाघात ठाकरेंनी केला आहे. तसेच सॉसची बाटली कुणी दिली? असा सवाल उपस्थित करत शेलक्या शब्दात ठाकरेंनी सोमैयांवर निशाणा साधला आहे.


शिवसेना पक्षप्रमुखांनी मराठी भाषेबद्दलही भाष्य केले आहे. मुंबई, मराठी माणसाठी अडवणूक केंद्रातून केली जात असल्याची टीका मुख्यमंत्र्यांनी केली आहे.  तसेच मराठीला अभिजात दर्जा न देणारं सरकार केंद्रात असल्याची टीका त्यांनी केली आहे.


राज ठाकरे यांनी मनसे सभेत ठाकरे सरकारवर निशाणा साधला. तसेच मशिदींवरील भोंगे उतरव्याबाबत आक्रमक भूमिका घेतली. त्यामुळे शिवसेनेच्य जाहीर सभेत शिवसेना पक्षप्रमुखांनी राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. भाषणात त्यांनी राज ठाकरे यांचा उल्लेख मुन्नाभाई असा केला आहे. तसेच राज म्हणजे केमिकल लोचा झालेली केस, असा घणाघातही शिवसेना पक्षप्रमुखांनी केला आहे.


महाराष्ट्राला बदनाम करणारे विरोधकांचे राजकारण सुरू आहे. त्यामुळे अंगावर आलात तर ऐकून घेणार नाहीत, असा इशारा शिवसेना पक्षप्रमुख यांनी केला दिला आहे.


आमचे हिंदुत्व हृदयात राम आणि हाताला काम देणारे आहे. त्यामुळे हनुमानाचा आणि रामाचा अपमान होईल असे वागू नका, असे मुख्यमंत्री म्हणाले.


शिवसेना पक्षप्रमुखांनी बीएमसीच्या कामाचे कौतुक केले आहे. पालिका शाळेत प्रवेश मिळण्यासाठी आज पालक-विद्यार्थ्यांची रांग लागते असे ते म्हणाले.


दाऊद भाजपात आला तर मंत्री म्हणून कधीही समोर येऊ शकतो. – मुख्यमंत्री


केतकी चितळे यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर आक्षेपार्ह पोस्ट केली. यावर बोलताना केतकी चितळेच्या पोस्टवर ठाकरेंनी जोरदार टीका केली आहे. महाराष्ट्राची संस्कृती खालावली असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले आहेत.


तुमचे विकृत हिंदुत्व आम्हाला मान्य नाही. गेल्यावेळी त्यांनी भगव्या टोप्या घातल्या होता. भगव्या टोप्या का घातल्या असे विचारले तर हिंदुत्वाचा मुद्दा पुढे केला. त्यामुळे हिंदुत्व टोपीत नाही, डोक्यात असतं, मेंदुत असतं, मुख्यमंत्री म्हणाले.


जमलेल्या गर्दीमध्ये जिवंतपणा आहे. ही गर्दी म्हणजे वाघ आहे, असे शिवसेना पक्षप्रमुख म्हणाले.


शिवसेना पक्षप्रमुखांनी बाबरी मशिदीवर भाष्य केलं. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या वजनाने बाबरी पडली असती, अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी फडणवीसांवर निशाणा साधला आहे. तसेच फडणवीस बाबरीच्या सहलीला गेले होते का? असा सवाल त्यांनी उपस्थित करत त्यांनी फडणवीसांवर टीका केली आहे.


राज्यात पेटलेला भोंग्याविषयावरही शिवसेना पक्षप्रमुखांनी भाष्य केलं. ‘भाजपाच्या भोंग्यात नितीश कुमार यांनी पाणी ओतले, असा आरोप त्यांनी केला आहे.


शिवसेना काँग्रेससोबत गेली म्हणजे शिवसेनेने हिंदुत्व सोडले असे होत नाही. – मुख्यमंत्री


आमचं हिंदुत्व ठरवणारे तुम्ही कोण? आमचं हिंदुत्व खर आहे की खोटं हे ठरवणारे तुम्ही कोण? असा सवालही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला आहे.


काश्मिरी पंडितांना सुरक्षा नाही परंतु येथे भोकं पडलेल्या टिनपाट लोकांना केंद्र वाय प्लस, झेड प्लस सुरक्षा देत आहे. या टिनपाट लोकांना केंद्राची सुरक्षा का, असा सवाल मुख्यमंत्र्यांनी उपस्थित केला आहे.


अकबरुद्दीन ओवैसी यांनी औरंगजेबाच्या कबरीचे दर्शन घेतले. यावरही मुख्यमंत्री ठाकरे यांनी भाष्य केले. यावेळी त्यांनी ओवैसींवर टीका केली.


अतिरेक्यांसमोर काय हनुमान चालीसा वाचायची? – मुख्यमंत्री


खोटं बोलणं हे त्यांच्या हिंदुत्वात बसतं, आपल्या नाही, असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले.


सामनाच्या लिखाणाचे शिवसेना पक्ष प्रमुखांकडून समर्थन


भाजपा हा विकृत, भेसूर चेहऱ्याचा मित्र – मुख्यमंत्री


भाषणामध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी महागाईवर भाष्य केले आहे. राज्यातील महागाईमुळे नागरिक त्रस्त आहे. मात्र, महागाईवर कुणी का बोलत नाहीएत? असा सवाल उपस्थित करत मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. तसेच केंद्र जीेएसटी देत नाही, असेही ते म्हणाले.


जनसंघाने संयुक्त महाराष्ट्र समिती फोडली – मुख्यमंत्री


संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात तुम्ही नव्हता तसेच संघाचे स्वातंत्र्य लढ्यात काय योगदान? असा सवालही शिवसेना पक्षप्रमुखांनी उपस्थित केला आहे.


मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी होऊ देणार नाही – मुख्यमंत्री


भाजपाला सोडले म्हणजे गाढवाला सोडले, असे म्हणत शिवसेना पक्षप्रमुखांची फडणवीसांवर टीका केली.


खोटे हिंदुत्व असलेला पक्ष देशाची दिशाभूल करतोय – मुख्यमंत्री


गाढवासमोर वाचली गीता कालचा गोंधळ बरा होता, विरोधकांवर मुख्यमंत्र्यांचा निशाणा


भाजपावर शिवसेना पक्षप्रमुखांची टीका


बऱ्याच दिवसांनी मैदानात, मोकळा श्वास घेतोय – उद्धव ठाकरे


मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सभेला संबोधित करणार. 


१५ जून रोजी चलो अयोध्या – संजय राऊत


ओवैसींकडून महाराष्ट्राचा अपमान झाला आहे – संजय राऊत


काश्मिरी पंडीत आज सर्वाधिक असुरक्षित – संजय राऊत


औरंगजेबाचा जन्म गुजरातमध्ये झाला आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म महाराष्ट्रात झाला – संजय राऊत


सेनेचं हिदुत्व  हे छत्रपती संभाजीराजे यांच्यासारखं आहे – संजय राऊत


मुख्यमंत्री ठाकरे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. 


सभास्थळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आगमन.


शिवसेना कोणापुढे झुकणार नाही – संजय राऊत


आम्हाला संघर्षाची सवय आहे – संजय राऊत


मुंबईचा बाप शिवसेना आहे – संजय राऊत


खऱ्या तोफा काय आहेत, हे आज महाराष्ट्राला दिसणार आहे – संजय  राऊत


शिवसेनेच्या सभेचे शेवटचं टोक कुर्ल्यात आहे – संजय राऊत


शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या भाषणाला सुरूवात.


उत्कृष्ठ मुख्यमंत्र्यांच्या यादीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे याचं नाव – आदित्य ठाकरे


आज पक्षप्रमुखांनी मास्क काढून बोलायला सांगितले आहे – आदित्य ठाकरे


शिवसैनिक म्हणजे आमचं कवचकुंडल – आदित्य ठाकरे


गर्दीत देवाचा चेहरा दिसतोय – आदित्य ठाकरे


बोलायला माझ्याकडे शब्दच नाही – आदित्य ठाकरे


शिवसेनेचा नाद करायचा नाही – एकनाथ शिंदे


पर्यटनाला चालना देण्यासाठी तसेच विकास कामे मविआ करत आहे – एकनाथ शिंदे


आमची विकासकामं आमचा बाप आहे – एकनाथ शिंदे


मुख्यमंत्र्यांच्या भाषणाला लवकरच सुरूवात होणार.


मुख्यमंत्री सभास्थळी पोहचले.


शिवसैनिक कोणाच्या बापाला घाबरणार नाही – एकनाथ शिंदे


ही जमवलेली नाही तर कमवलेली गर्दी आहे – एकनाथ शिंदे


अंगावर येईल त्याला शिंगावर घेणार – गुलाबराव पाटील


शिवसेना हा विचार आहे – गुलाबराव पाटील


मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सभेसाठी रवाना.


पर्यटन मंत्री आणि शिवसेना नेते आदित्य ठाकरे सभास्थळी पोहचले.


पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे थोड्याच वेळी सभेस्थळी दाखल होणार.


शिवसेना कार्यकर्ते बीकेसीकडे रवाना झाले आहेत.


डोंबिवली शहरातून १०० हून अदिक बस सभेसाठी मुंबईकडे रवाना झाले आहेत.


मुंबईत ठिकठिकाणी शिवसेनेच्या सभेचे फलक लावण्यात आले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.