Sun. May 31st, 2020

‘असा’ आहे 22 डिसेंबरचा मेगा ब्लॉक

रेल्वे प्रशासनाकडून दरवेळी प्रमाणे आजही 22 डिसेंबर रोजीही रविवारी मध्य रेल्वे (Central railway), हार्बर रेल्वे आणि पश्चिम रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक (Mega block) ठेवण्यात आला आहे. दरम्यान, आजचा ब्लॉक रेल्वेची दुरूस्ती आणि तांत्रिक कामे पूर्ण करण्यासाठी होत आहे.

मध्य रेल्वे

मध्य रेल्वेच्या माटुंगा ते मुलुंड स्थानकाच्या डाऊन जलद मार्गावर सकाळी 10.30 ते 3.00 या वेळेत ब्लॉक आहे. परिणामी या मार्गावरील लोकल फेऱ्या या 20 ते 25 मिनिटे उशिराने असतील.

हार्बर रेल्वे

हार्बर रेल्वे (Harbour Railway) मार्गावर चुनाभट्टी/वांद्रे- सीएसएमटी स्थानकाच्या दरम्यान डाऊन मार्गावर 11.10 ते 4.10 दरम्यान ब्लॉक आहे.

CSMT- चुनाभट्टी/वांद्रे मार्गावरही 11.10 ते 3.40 या वेळेत ब्लॉक आहे.

याशिवाय, सकाळी 11.34 ते दुपारी 4.20 पर्यंत सीएसएमटी/वडाळा ते वाशी/बेलापुर/पनवेल मार्गावरील लोकल फेऱ्या पूर्णतः बंद असतील.

मात्र प्रवाशांच्या सोयीसाठी कुर्ला- पनवेल अशा विशेष लोकल सोडण्यात येणार आहेत.

संध्याकाळी 6 वाजेपर्यंत आपल्या नियमित तिकिट/ पास वर प्रवासी या मार्गावरून प्रवास करू शकतील.

पश्चिम रेल्वे

पश्चिम रेल्वे (Western railway) वर आज सकाळी 11 ते दुपारी 3 दरम्यान बोरिवली ते भाईंदर दरम्यान धीम्या मार्गावर ब्लॉक आहे.

यावेळेत काही लोकल फेऱ्या रद्द राहणार असून अन्य गाड्या या बोरिवली- भाईंदर दरम्यान जलद मार्गावरून चालवण्यात येणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *