Sat. May 25th, 2019

मुंबईकरांनो, 12 मे रोजी असा आहे ‘मेगा ब्लॉक’ !

0Shares

मध्य रेल्वे मुख्य मार्ग आणि पश्चिम रेल्वेवर १२ मे रोजी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. ठाणे ते कल्याण डाऊन धिमा मार्ग, दिवा ते ठाणे अप धिमा मार्ग आणि सांताक्रूझ ते माहीमदरम्यान दोन्ही धिम्या मार्गावर हा ब्लॉक असेल. काही लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या असून लोकल उशिरानेही धावतील. हार्बर मार्गावर ब्लॉक घेण्यात येणार नाही.

मध्य रेल्वे-मुख्य मार्ग

कुठे? – ठाणे ते कल्याण डाऊन धिमा मार्ग, दिवा ते ठाणे अप धिमा मार्ग

कधी? रविवार, डाऊन मार्ग – स. ११. ते दु. ४ आणि अप मार्ग- स. ११ ते दु.२ वा.

परिणाम: मुलुंड ते कल्याणदरम्यान डाऊन धिम्या मार्गावरील लोकल डाऊन जलद मार्गावर वळवण्यात येणार आहे. त्यामुळे ठाणे, दिवा व डोंबिवली स्थानकात लोकल थांबतील. कळवा, मुंब्रा व ठाकुर्ली स्थानकांत डाऊन धिम्या लोकल थांबणार नाहीत. दिवा ते मुलुंडदरम्यान अप धिम्या लोकल जलद मार्गावर चालवण्यात येणार आहेत. अप मार्गावरील लोकल कळवा व मुंब्रा स्थानकात थांबणार नाहीत.

पश्चिम रेल्वे

कुठे? – सांताक्रूझ ते माहीमदरम्यान दोन्ही धिम्या मार्गावर

कधी? – रविवार, स.१०.३५ ते दु.३.३५

परिणाम: मुंबई सेन्ट्रल ते माहीमदरम्यान धिम्या मार्गावरील लोकल जलद मार्गावर धावतील. लोअर परळ, माहीम, खार स्थानकांत लोकल गाडय़ांना दुहेरी थांबा दिला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *