Sun. Jun 20th, 2021

मेगाब्लॉक : 3 फेब्रुवारी रोजी ‘असं’ आहे local चं वेळापत्रक

पश्चिम, मध्य आणि हार्बर या तिन्ही मार्गावर रविवार 3 फेब्रुवारी रोजी mega block ठेवण्यात आला आहे. या दरम्यान CSMT ते मानखूर्द दरम्यान विशेष गाड्या चालवण्यात येतील. मध्य रेल्वे महामार्गावरील माटुंगा ते मुलुंड डाउन जलद  तसंच हार्बरच्या मानखुर्द ते नेरूळ स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन या दोन्ही मार्गावर मेगाब्लॉक राहील.

रविवारी सकाळी 9.53 ते दुपारी 2.42 पर्यंत CSMT वरून सुटणाऱ्या जलद मार्गावरील सर्व लोकल शीव ते मुलुंड स्थानकांदरम्यान मंद गतीने धावतील.

मुलुंडनंतर सर्व लोकल डाऊन जलद मार्गावर वळवण्यात येतील.

रविवारी सकाळी 11.30 ते दुपारी 3.16 पर्यंत CSMT वरून पनवेल, बेलापूर,वाशी पर्यंत कोणतीही लोकल धावणार नाही.

तब्बल 11 तासांचा मेगाब्लॉक

पश्चिम रेल्वे वरील लोअर परळच्या कामादरम्यान 2 फेब्रुवारीला रात्री 10 पासून ते 3 फेब्रुवारीला सकाळी 9 पर्यंत राहील.

Mega block दरम्यान चर्चगेट ते वांद्रे मंद गतीने मार्गावर तसेच चर्चगेट ते दादर जलद मार्गावर लोकल चालविण्यात येणार नाहीत.

जलद मार्गावरील सर्व लोकल दादरपर्यंत तर मंद मार्गावरील सर्व लोकल विरार मार्गावरून धावतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *