Wed. Jan 19th, 2022

रेल्वेच्या तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक

रेल्वेच्या तिन्ही मार्गावर आज मेगाब्लॉक आहे.

रेल्वे रुळांच्या दुरुस्तीचे काम तसेच ओव्हरहेड वायरचे काम सुरू असल्यामुळे हा मेगाब्लॉक ठेवण्यात आला आहे.

यामुळे प्रवाशांचे मात्र मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत.

 

या मार्गावर मेघा मेगाब्लॉक

मध्य रेल्वेवर ठाणे -कल्याण दरम्यान मेगाब्लॉक

रविवारी सकाळी ११.१० ते दुपारी ३.३० वाजेपर्यंतचा हा ब्लॉक

ब्लॉककाळात सर्व लोकल डाऊन जलद मार्गावर वळवण्यात येणार

मुख्य मार्गावरील अप आणि डाऊन लोकल फेऱ्या ११ ते ५ वाजेपर्यंत १० मिनिटे उशिराने धावण्याची शक्यता

हार्बर मार्गावर कुर्ला -वाशी दरम्यान ब्लॉक

रविवारी सकाळी ११.१० ते दु. ३.४० वाजेपर्यंत अप आणि डाऊन मार्गावर ब्लॉक

परणामी ब्लॉककाळात कुर्ला-वाशी मार्गावरील लोकल फेऱ्या बंद राहणार

सीएसएमटी – कुर्ला आणि वाशी-पनवेल मार्गावर विशेष फेऱ्या चालवण्यात येणार

पश्चिम रेल्वे मार्गावर बोरिवली – अंधेरी दरम्यान ब्लॉक

रविवारी सकाळी १०.३५ ते दु. ३.३५ या वाजेपर्यंत ब्लॉक

ब्लॉक काळातील सर्व जलद मार्गावरील लोकल फेऱ्या अप आणि डाऊन धीम्या मार्गावर वळवण्यात येणार

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *