Thu. Jul 9th, 2020

“महागठबंधन म्हणजे थट्टाच, मोदी सरकारचा पर्याय नव्हे!”

भाजपविरोधात विरोधी पक्षांनी एकत्र येत महागठबंधन तयार केलं आहे. कोलकात्य़ाला ममता बॅनर्जी य़ांच्या मेगारॅलीमध्ये 20 विविध पक्षाचे प्रतिनिधी एकत्रित आले. त्यामुळे मोदी सरकारला एक सक्षम पर्याय उभा राहत असल्याचं बोललं जात आहे. मात्र महागठबंधन म्हणजे थट्टाच असल्याचा दावा स्वराज इंडिया पक्षाचे अध्यक्ष योगेंद्र यादव यांनी केलाय.

महागठबंधन म्हणजे थट्टाच!

महागठबंधन म्हणजे एक थट्टाच असल्याचं त्यांनी म्हटलंय. महागठबंधन विचारहीन पोकळ नेत्यांनी भरलेलं असल्याची टीका यादव यांनी केली. महागठबंधनातील जे नेते मोदी विरोधी किंवा भाजप विरोधी असल्याचा कांगावा करत आहेत, प्रत्यक्षात ते स्वतःही लोकशाहीविरोधी आणि भ्रष्टच आहेत, असा आरोप यादव यांनी केलाय.

“कोलकात्याला मोठी रॅली झाली. मात्र त्यात विचारधारा कुठे आहे? त्यांचा अजेंडा काय आहे? यासंदर्भात कोणतीही चर्चा झाली नाही. ना शेतकऱ्यांच्या समस्यांवर कुणी बोललं, ना कुणी बेरोजगारीच्या मुद्द्यावर. त्यामुळे मला वाटतं, की हे महागठबंधन दिशाहीन आहे.” असं वक्तव्य योगेंद्र यादव यांनी केलंय.

मोदीविरोधकांनी स्वतः काय केलंय?

मोदींच्या विरोधात सर्व विरोधकांनी एकजूट दाखवत महागठबंधन केलंय. मात्र यात सहभागी झालेले विरोधक स्वतः काय आहेत, असा सवाल यादव यांनी केलाय. मोदींना लोकशाही विरोधक म्हणणाऱ्य़ा ममता बॅनर्जी स्वतः काय आहेत. त्यांनी स्वतःही पंचायत निवडणुका शांततामय मार्गाने होऊ दिल्या नव्हत्या. त्यांनी आपल्या विरोधात कोणतीही रॅली होऊ दिली नव्हती. शरद पवार, अखिलेश यादव, मायावती यांसारखे महागठबंधनातील सहभागी देशाला भ्रष्टाचारापासून रोखण्याच्या बाता मारत आहेत. त्यामुळे हे महागठबंधन आतून पोकळ आहे.

 

महागठबंधन हा मोदींना पर्याय नाही

महागठबंधन ही विरोधकांची एकजूट असली, तरी मोदींना पर्याय नाही. या महागठबंधनमधील नेते ५ वर्षांत कुठे होते, जेव्हा शेतकरी आत्महत्या करत होते? यातले नेते कुठे होते जेव्हा बरोजगार तरुण आंदोलन करत होते? त्यावेळी स्वराज इंडिया पक्षानेच यासाठी पुढाकार घेतला होता, असंही योगेंद्र य़ादव यांनी म्हटलं.

 

हे ही वाचा-  ‘देश संकट में है’ म्हणत विरोधकांची एकजूट!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *