Sun. Oct 24th, 2021

आज तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक

रेल्वेच्या विविध कामांनिमित्त या रविवारी रेल्वेच्या तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक असणार आहे. मध्य रेल्वेच्या मुलुंड ते माटुंगा अप जलद मार्गावर तर हार्बरवरील वडाळा ते मानखुर्द दोन्ही मार्गावर आणि बोरिवली ते अंधेरी दोन्ही धिम्या मार्गावर मेगाब्लॉक घेतला जाणार आहे.

मध्य रेल्वे मार्ग

मुलुंड-माटुंगा आणि वडाळा रोड-मानखुर्द या स्थानकांदरम्यान हा ब्लॉक घोषित करण्यात आला आहे

मुलुंड ते माटुंगा  स्थानकांदरम्यान  अप जलद मार्गावर स.11.15 वा ते दु.3.45  वा ब्लॉक  असेल.
पश्चिम रेल्वेवर बोरिवली ते अंधेरीदरम्यान ब्लॉक आहे.
शनिवार-रविवारच्या मध्यरात्री वांद्रे स्थानकात ब्लॉक असणार आहे.
सकाळी 11 ते सायंकाळी 6  पर्यंत सीएसएमटीकडे येणाऱ्या आणि  सुटणाऱ्या लोकल 10  ते 15 मिनिटे उशीरा धावतील.
हार्बर रेल्वे  मार्ग
वडाळा रोड ते मानखुर्द या स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन मार्गावर  स. 11.10 ते दु. 4.10   ब्लॉक  असेल.
 ब्लॉककाळात हार्बर मार्गावरील लोकल फेऱ्या बंद राहणार आहेत

ब्लॉककाळात धीम्या मार्गावरील लोकल अप आणि डाऊन जलद मार्गावर वळण्यात येणार आहे.

पश्चिम रेल्वे

बोरिवली ते अंधेरी दोन्ही धिम्या मार्गावर ब्लॉक असेल.

स.10.35 ते दु. 3.35  वा.हा मेगाब्लॉक घेतला जाणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *