Mon. Aug 15th, 2022

आज तीनही मार्गावर मेगाब्लॉक; मुंबई उपनगरात मेगाब्लॉक

नेहमीप्रमाणे या रविवारी सुद्धा रेल्वे प्रशासनाने मेगाब्लॉकचे नियोजन केले आहे. मात्र हा मेगाब्लॉक फक्त मुंबई उपनगरात असल्याने उपनगरातील प्रवाशांना वेळापत्रक बघून प्रवास करणे आवश्यक आहे. आज तीनही मार्गावर मेगाब्लॉक नियोजित केला आहे. कल्याण ते ठाणे अप जलद मार्गावर तर हार्बरवर पनवेल ते वाशी, नेरुळ, बेलापूर ते खारकोपर या मार्गावर असणार आहे. त्याचबरोबर पश्चिम रेल्वेवर मरिन लाइन्स ते माहिमदरम्यान डाऊन धिम्या मार्गावर ब्लॉक नियोजित केला आहे.

आज तीनही मार्गावर ब्लॉक –

मध्य मार्गावर कल्याण ते ठाणे अप जलद मार्गावर सकाळी ११.२० ते दुपारी ३.५० वाजेपर्यंत असणार आहे.

तर हार्बर मार्गावर पनवेल ते वाशी, नेरुळ, बेलापूर ते खारकोपर या दोन्ही मार्गावर सकाळी ११.३० ते दुपारी ४.०० पर्यंत असणार आहे.

पश्चिम मार्गावर मरिन लाइन्स ते माहिमदरम्यान डाऊन धिम्या मार्गावर सकाळी १०.३५ ते दुपारी ३.३५ वाजेपर्यंत असणार आहे.

त्यामुळे प्रवाशांनी वेळापत्रक बघूनच प्रवास करावा असे रेल्वे प्रवाशांनी आव्हान केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.