रविवारी रेल्वेच्या तीनही मार्गावर मेगाब्लॉक

उपनगरीय रेल्वेने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. मार्च महिन्याच्या पहिल्याच दिवशी रविवारी लोकल रेल्वेच्या तीनही मार्गावर मेगाब्लॉक असणार आहे.

या मेगाब्लॉकची माहिती मध्य रेल्वेने अधिकृत ट्विट खात्यावरुन दिली आहे. तीनही मार्गावर मेगाब्लॉक असल्याने रविवारी रेल्वे वेळापत्रक पाहूनच बाहेर पडा.

असा असेल मेगाब्लॉक

पश्चिम रेल्वे

पश्चिम रेल्वे मार्गावर बोरिवली ते गोरेगाव स्थानकादरम्यान हा मेगाब्लॉक असणार आहे. सकाळी 10.35 ते दुपारी 3. 35 पर्यंत हा मेगाब्लॉक असेल.

या मेगाब्लॉक दरम्यान 1-4 प्लॅटफॉर्मवरुन लोकल सुटणार नाही.

मध्य रेल्वे

मध्य रेल्वेवर सकाळी 11 ते दुपारी 4 या वेळेदरम्यान हा एकूण 5 तासांचा मेगाब्लॉ़क असेल.

या मेगाब्लॉक दरम्यान डाऊन धीम्या मार्गावरील लोकल डाऊन जलद मार्गावरुन लावतील.

हार्बर रेल्वे मार्ग

हार्बर मार्गावर पनवेल-मानखुर्द दरम्यान हा मेगाब्लॉक असेल. रविवारी सकाळी 10 वाजून 12 मिनिटांनी या मेगाब्लॉकला सुरुवात होईल. तर दुपारी 4 वाजून 36 मिनिटांनी हा ब्लॉ़क संपेल.

सीएसएमटी- पनवेल, बेलापूर, वाशी, सीएसएमटी दरम्यान लोकल रेल्वेसेवा बंद राहिल.

या मेगाब्लॉकमुळे रेल्वे सेवा 20 मिनिटांनी उशीरा असणार आहेत.

Exit mobile version