Fri. Oct 7th, 2022

मध्य आणि हार्बर मार्गावर ‘मेगाब्लॉक’

मुंबईकरांनो आज घराबाहेर पडण्याच्या विचारात असाल आणि लोकलने प्रवास करायचं ठरवलं असेल, तर लोकलचं वेळापत्रक नक्की तपासा. कारण आज लोकल मार्गावर मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. रेल्वे रुळांची देखभाल, सिग्नल यंत्रणा दुरुस्ती ओव्हरहेड वायर यांसारख्या कामांसाठी मध्य आणि हार्बर मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.

पनवेल आणि बेलापूर येथून सकाळी १०.३३ ते दुपारी ३.४९ पर्यंत सुटणाऱ्या, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईकडे जाणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा तसेच छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी ९.४५ ते दुपारी ३.१२ या वेळेत पनवेल आणि बेलापूरकडे जाणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा रद्द करण्यात येतील. पनवेल येथून सकाळी ११.०२ ते दुपारी ३.५३ वाजेपर्यंत सुटून ठाण्याकडे जाणार्या अप ट्रान्सहार्बर मार्गावरील सेवा आणि ठाणे येथून सकाळी १०.०१ ते दुपारी ३.२० वाजेपर्यंत पनवेल करीता जाणाऱ्या ट्रान्सहार्बर मार्गावरील सेवा रद्द करण्यात आल्या आहेत.

ब्लॉक काळात छत्रपती शिवाजी टर्मिनस मुंबई-वाशी भागामध्ये विशेष उपनगरी लोकल चालविण्यात येणार आहेत. तसेच ब्लॉक कालावधीत ठाणे – वाशी, नेरुळ स्थानकांदरम्यान ट्रान्सहार्बर लाईन सेवा उपलब्ध करण्यात आली आहे. ब्लॉक कालावधीत बेलापूर, नेरुळ – खारकोपर लाईन सेवा उपलब्ध राहतील. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी १०.१४ ते दुपारी 3.32 पर्यंत सुटणाऱ्या धीम्या मार्गावरील सेवा माटुंगा आणि मुलुंड स्थानकांदरम्यान डाऊन जलद मार्गावर वळवल्या जाणार आहेत. या सेवा माटुंगा आणि मुलुंड स्थानकांच्यादरम्यान शीव, कुर्ला, घाटकोपर, विक्रोळी, भांडुप आणि मुलुंड या स्थानकांवर थांबवून पुन्हा डाऊन धिम्या मार्गावर वळवल्या जाणार आहेत.

तसेच ठाण्यातून सकाळी १०.५८ ते दुपारी ३.५९ वाजेपर्यंत अप धिम्या मार्गावरील सेवा मुलुंड आणि माटुंगा दरम्यान अप जलद मार्गावर वळवल्या जाणार आहेत. तर या सेवा मुलुंड, भांडुप, विक्रोळी, घाटकोपर, कुर्ला आणि शीव येथे थांबतील. पुढे त्या अप धीम्या मार्गावर वळवल्या जातील.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.