Sat. Feb 23rd, 2019

हार्बर मार्गावर आज मेगाब्लॉक

0Shares

रेल्वे रुळांची देखभाल आणि तांत्रिक कामांसाठी आज रविवारी हार्बर आणि पश्चिम रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक घेतला जाणार आहे. यामुळे हार्बर मार्गावर सकाळी 11:40 ते दुपारी 4:10 पर्यंत बंद राहणार आहे. प्रवश्यांच्या सोयीसाठी विशेष गाड्या सोडण्यात आल्या आहे.

मेगाब्लॉक अपडेट –

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते चुनाभट्टी आणि वांद्रे डाऊन आणि अप हार्बर मार्गावरील वाहतूक बंद राहील.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, वडाळा रोड ते वाशी, बेलापूर, पनवेल डाऊन हार्बर मार्गावरील गाड्या रद्द करण्यात आल्या आहे.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते वांद्रे, गोरेगाव अप आणि डाऊन हार्बर मार्गावरील गाड्या बंद राहतील.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई ते पनवेल, बेलापूर वाशी अप हार्बर मार्गावरील गाड्या रद्द करण्यात आल्या आहे.

पनवेल आणि कुर्ला स्थानकातून विशेष गाड्या सोडण्यात येणार आहे.

हार्बर मार्गावर ब्लॉक असल्यामुळे प्रवाश्यांना सकाळी 10 ते सायंकाळी 6 दरम्यान मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या स्थानकावरून प्रवास करण्याची मुभा देण्यात आली आहे.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *