Thu. Jan 27th, 2022

ब्रिटीश राजघराण्यात एका चिमुकल्याचे आगमन; मेगन मार्कलने दिला बाळाला जन्म

गेल्या वर्षी मेगन मार्कलने ब्रिटनच्या राजघराण्याचे प्रिन्स हॅरीसोबत लग्न बंधनात अडकली. प्रिन्स हॅरी आणि मेगन मार्कल यांच्या आयुष्यात एका नव्या पाहुण्याचे आगमन झाले आहे. ससेक्स रॉयल या instagram अकाऊंटवरून प्रिन्स हॅरी आणि मेगन मार्कलला मुलगा झाल्याची माहिती शेअर केली आहे. त्यामुळे ब्रिटनच्या राजघराण्यात एका गोंडस बाळाचा जन्म झाला आहे.

मेगन मार्कलला गोंडस बाळ –

प्रिन्स हॅरी आणि मेगन मार्कल यांना बाळ झाल्याची माहिती ससेक्स रॉयल या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आली आहे.

या अकाऊंटद्वारे एक विशेष पोस्ट शेअर केली आहे.

आम्हाला सांगण्यास आनंद होत आहे की, द ड्युक आणि डचेस ऑफ ससेक्स यांना 6 मे 2019 मुलगा झाला आहे.

डचेस आणि बाळाची प्रकृती स्थीर आणि उत्तम असल्याचे पोस्टमध्ये म्हटलं आहे.

गेल्या वर्षी 19 मे रोजी प्रिन्स हॅरी आणि मेगन मार्कल लग्नबंधनात अडकले होते.

ब्रिटन राजघराण्याचे लग्न असल्यामुळे एकदम शाही पद्धतीने विवाह सोहळा पार पडला होता.

लग्न झाल्यानंतर मेगन मार्कलने अभिनय क्षेत्रातून माघार घेतली आहे.

प्रिन्स हॅरी आणि मेगन मार्कलचा पहिला मुलगा असून ब्रिटीश राजघराण्याच्या वारसा हक्कामध्ये सातव्या क्रमांकाचा दावेदार असल्याचे समजते आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *